• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात झाडांच्या वाढलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा; तातडीने छाटणीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

शहादा शहरातील बस स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत तसेच इतर प्रमुख रस्त्यांवरील झाडांच्या वाढलेल्या व रस्त्यावर झुकलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने झाडांची छाटणी करावी, अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

बस स्थानक ते शिवाजी महाराज स्मारक या मुख्य मार्गावरील दुभाजकातील तसेच म्युनिसिपल हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या आहेत. यामुळे समोरून येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील इतर रस्त्यांवरही झाडांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर वाकून आल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. काही ठिकाणी बस आणि अवजड वाहन चालकांनाही वाहन चालविताना विशेष दक्षता घ्यावी लागत आहे. पावसाळ्यात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे या फांद्या तुटून वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अलीकडेच मुंबईतील चेंबूर येथे झाडाची फांदी शाळेच्या बसवर कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारची दुर्घटना शहादा शहरात घडू नये, यासाठी नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे तातडीने पाहणी करून धोकादायक फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील धोकादायक फांद्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“शहादा शहरातील मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या रस्त्यावर झुकलेल्या फांद्या वाहतुकीस अडथळा ठरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात या फांद्या तुटून वाहनांवर किंवा पादचाऱ्यांवर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपालिका प्रशासन आणि वन विभागाने संयुक्तपणे तातडीने छाटणी करावी.”
— ईश्वर पाटील, अध्यक्ष, शहादा तालुका प्रवासी महासंघ

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

कृषी दिनानिमित्त शहाद्यात ‘खेती बचाव अभियान’ उत्साहात संपन्न

Next Post

शहाद्यात ५ जुलै रोजी राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
60
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
75
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

शहाद्यात ५ जुलै रोजी राज्यस्तरीय कवी संमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा

ताज्या बातम्या

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

मुक्त पूर्व दिनानिमित्त मानव जागृतीचा संदेश

August 16, 2026
परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

परिश्रम मतिमंद विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

August 16, 2026
कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

कौशल्यातून रोजगार, रोजगारातून स्वावलंबन

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In