• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ महाराष्ट्रभर लागू करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

बुलढाणा | प्रतिनिधी :

बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंदे, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीविरोधात प्रभावी मोहीम राबविणारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलेश तांबे यांच्या संकल्पनेतील ‘मिशन परिवर्तन’ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच अमरावती परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे केली आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

या मागणीसाठी वारकरी धर्म परिषद, सन्मान स्वतंत्र कामगार संघटना, ग्राम स्वराज्य समिती, आझाद हिंद संघटना, रमाई ब्रिगेड, किसान ब्रिगेड, मातृतीर्थ रणरागिनी संघटना आणि महानायक विचारमंच आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत निवेदने तसेच ई-मेलद्वारे पाठपुरावा केला आहे.

‘मिशन परिवर्तन’ची प्रभावी अंमलबजावणी

डॉ. निलेश तांबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत व्यसनमुक्त आणि अवैध व्यवसायमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम, पथनाट्य, विशेष पोलीस पथके, पालक-शिक्षक संवाद, गुटखा बंदी आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर नियंत्रण यांसारख्या उपाययोजना राबविण्यात आल्या.

या उपक्रमांमुळे जिल्ह्यात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा विविध संघटनांनी केला असून, जनसामान्यांमध्ये डॉ. तांबे यांची ‘कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक’ म्हणून प्रतिमा निर्माण झाली आहे.

सामाजिक संघटनांचा पाठिंबा

वारकरी हभप विलास महाराज वाघमारे, शेख युनूस, योगेश कोकाटे, विजय साबळे पाटील, अशोक बाहेकर, पंचफुलाबाई गवई, सिद्धार्थ वानखेडे, भारती अवचार आणि गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ‘मिशन परिवर्तन’ राज्यभर राबविण्याची मागणी केली आहे.

बुलढाणा पॅटर्नची चर्चा

यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी महसूल विभागातील ई-सेवा प्रणाली प्रभावीपणे राबवून ‘मातृतीर्थ बुलढाणा पॅटर्न’ राज्यभर चर्चेत आणला होता. त्याच धर्तीवर आता डॉ. निलेश तांबे यांचे ‘मिशन परिवर्तन’ही महाराष्ट्रात लागू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Vasant Jagtap
Previous Post

मायणी परिसरात जिलेटिन स्फोटक पदार्थ सापडल्याने खळबळ; कठोर कारवाईची मागणी

Next Post

मोटारसायकल चोरीप्रकरणी सराईत चोरट्यास अटक; ५ तासांत गुन्ह्याची उकल, १० दुचाकी जप्त

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

मोटारसायकल चोरीप्रकरणी सराईत चोरट्यास अटक; ५ तासांत गुन्ह्याची उकल, १० दुचाकी जप्त

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In