• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन उत्साहात संपन्न; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी :

हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मौजे काळेवाडी (दिवे) येथे कृषी दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पुरंदर आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर, काळेवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सभापती अमित झेंडे यांनी भूषविले. यावेळी हरिभाऊ लोळे, अजय इंगळे, स्मिता निगडे, गटविकास अधिकारी सुरेश थोरात, महेंद्र गिरमे, अनिल दुर्गुडे, मयूर कचरे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत अंजीर पिकाचा समावेश झाल्याची माहिती दिली. अंजीर पिकासाठी प्रति हेक्टर १६ लाख रुपयांची विमा संरक्षित रक्कम आणि ८ हजार रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आल्याचे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी विमा घेण्याचे आवाहन केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे डॉ. प्रदीप दळवे यांनी हिरवळीचे खत, सेंद्रिय घटक आणि जमिनीची सुपीकता वाढविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच अंजीर पिकासाठी योग्य बहार व्यवस्थापनाबाबत माहिती दिली.

डॉ. युवराज बालगुडे यांनी सीताफळ व अंजीर पिकातील कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करत एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे महत्त्व सांगितले. कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ दीपक गावडे यांनी हवामान बदल, एल निनोचा परिणाम, कमी पावसाच्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन आणि बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

बँक ऑफ महाराष्ट्रचे कृषी अधिकारी उमेश निकम यांनी शेतीपूरक व्यवसाय, महिला बचत गट प्रशिक्षण आणि शेतकरी कर्ज योजनांची माहिती दिली. प्रगतशील शेतकरी अतुल सस्ते यांनी रुंद वरंबा आणि सरी (BBF) तंत्रज्ञान पद्धतीची माहिती देत आधुनिक लागवड तंत्राचे प्रात्यक्षिक सादर केले.

कार्यक्रमादरम्यान खरीप हंगाम २०२५-२६ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बोपगाव व दिवे येथील पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गटांचाही गौरव करण्यात आला.

हरिभाऊ लोळे यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास पुरंदर तालुक्यातील उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, माजी सरपंच योगेश काळे, महिला शेतकरी, प्रगतशील शेतकरी तसेच कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभवातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जगताप यांनी केले तर आर. डी. खेसे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, रविंद्र खेसे, गणेश जगताप आणि सासवड मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Vinayak Gaikwad
Previous Post

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या हलगर्जीपणामुळे टेंभीखोडावे परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

Next Post

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

खारपाडा गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर यश; पखवाज सोलो वादन स्पर्धेत प्रशांत घरत यांचा द्वितीय क्रमांक

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In