• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांचा संताप; पाणीटंचाई व अस्वच्छतेमुळे तीव्र नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

परतूर प्रतिनिधी :
परतूर शहरात नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शहरातील अनेक भागांत आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“धरण उशाला आणि कोरड घशाला” अशी परिस्थिती शहरात निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक भागांतील नागरिकांना टँकर किंवा इतर पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

दरम्यान, शहरातील स्वच्छतेच्या कामांबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वच्छता कर्मचारी केवळ नावालाच काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून अनेक रस्ते आणि नाल्या घाणीने तुडुंब भरल्याचे चित्र आहे. पाऊस पडल्यानंतर नाल्यांतील घाण रस्त्यावर येत असून ती साफ करण्यासाठी वेळेवर कर्मचारी येत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

काही नागरिकांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करत, “पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत,” असा आरोप केला आहे. तसेच नगरसेवक वार्डात फिरकत नसल्याचीही नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरातील सर्वच वार्डांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती असून प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

परतूरचे आमदार बबनराव लोणीकर तसेच राहुल लोणीकर यांनी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

सरण आंदोलनाला यश; भगूर–पांढुर्ली रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

Next Post

पिवंदळ बु. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी हवालदिल

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
154
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
77
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

पिवंदळ बु. परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस; शेतकरी हवालदिल

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In