• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाळधी-पोखरी चौफुलीवरील अपघातांची गंभीर दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

सुरक्षात्मक उपाययोजनांसाठी संबंधित विभागाला निर्देश; नागरिकांमध्ये समाधान

प्रतिनिधी | धरणगाव पाळधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाळधी खुर्द येथील पोखरी चौफुली (गायळ माता मंदिर परिसर) येथे सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांनंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी सादर केलेल्या निवेदनास अधिकृत उत्तर देण्यात आले असून, प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

RelatedPosts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

दि. २६ जून रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता पोखरी चौफुलीवर दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात स्प्लेंडर दुचाकीवरील ज्येष्ठ नागरिक नीलकंठ पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाचे हाड मोडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर चौफुलीवरील वाढत्या अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.

राष्ट्रीय महामार्गावरून अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडणारे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला तसेच आकाश बाम परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांना गुगल मॅप लोकेशनसह अधिकृत ई-मेलद्वारे निवेदन पाठवले होते. या निवेदनात पोखरी चौफुलीवर गतिरोधक, रिफ्लेक्टर तसेच इशारा फलक बसविण्याची मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री सचिवालयाने या निवेदनाची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही निवेदनाची नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण पाठविण्यात आल्याचे अधिकृत उत्तर देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे पोखरी चौफुलीवरील सुरक्षाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून गतिरोधक, रिफ्लेक्टर व आवश्यक सूचना फलक तातडीने बसवावेत. या कामाची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी सांगितले.

Tags: Tushar Shimpi
Previous Post

शाहूवाडीत खळबळ! ३८ हजारांची लाच घेताना PWD शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Next Post

बोरिवली येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
143
ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
28
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
77
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
Next Post

बोरिवली येथे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

‘जवळाबाजार’ लोकसंख्या असूनही तालुका होण्या पासून वंचित का.?गांवकरी…!

August 17, 2026
पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

पिंपळगाव कळमेश्वरी येथे स्वतंत्र दिन साजरा

August 17, 2026
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज ८० वा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In