• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालकांचा आदिवासी विकास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

धडगाव | प्रतिनिधी

नगर जिल्ह्यातील भानसहीवरे येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शैक्षणिक सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचा आरोप करत अक्कलकुवा, तळोदा आणि धडगाव तालुक्यातील पालकांनी गुरुवारी तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

संबंधित विद्यार्थ्यांचे तातडीने दुसऱ्या नामांकित शाळेत समायोजन करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी पालकांनी केली. प्रकल्प प्रशासनाने मागण्यांवर वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सुमारे २०० विद्यार्थ्यांना भानसहीवरे येथील शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, शैक्षणिक गुणवत्ता, वसतिगृह व्यवस्था, भोजन, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप पालकांनी केला.

या प्रकरणी प्रकल्प प्रशासनाने संबंधित संस्थेला नोटीस बजावत चौकशी केली असून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, नाशिक आदिवासी विभागाचे उपायुक्त दिनकर पावरा यांनी मोबाईलद्वारे पालकांशी संवाद साधून समायोजनाबाबत पालकांनी स्वतंत्र अभिप्राय सादर करावा, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

पालकांचे निवेदन प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत वरिष्ठांकडे तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी. आर. मुंगळे यांनी सांगितले.

“आमच्या मुलांची शासन आणि प्रशासनाने आबाळ करू नये. या शाळेतील शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची स्थिती गंभीर आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन त्यांचे तातडीने दुसऱ्या नामांकित शाळेत समायोजन करण्यात यावे,” अशी मागणी पालकांनी केली.

Tags: Vasant Pawara
Previous Post

धामणी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; विद्यालयाला तीन लाखांचे क्रीडा साहित्य

Next Post

फुले समृद्ध ग्राम ‘सांजोरी’ येथे शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात संपन्न

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

फुले समृद्ध ग्राम ‘सांजोरी’ येथे शेतकरी प्रशिक्षण व आढावा बैठक उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In