• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीक्षेत्र धामोरीहून अडबंगीनाथ महाराज पायी दिंडीचे ७ जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

धामोरी (वार्ताहर)

अधिष्ठान अडबंगीनाथ महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पुनीत झालेल्या तसेच त्यांची जन्मभूमी, तपोभूमी आणि दीक्षाभूमी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र धामोरी (ता. कोपरगाव) येथून आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या पारंपरिक अडबंगीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्याचे यंदाही मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

सन २०२६ च्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी निघणाऱ्या या दिंडीचे प्रस्थान मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री गोरक्षनाथ मंदिर, धामोरी येथून होणार आहे. त्यानंतर बुधवार, दि. ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता दिंडीचा मुख्य प्रवास पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अभंग-भजन आणि विठ्ठलनामाच्या गजरात हजारो वारकरी भक्त पायी चालत श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या भक्तिमय सोहळ्यात धामोरीसह नायगाव, देवी, मोरवी, सांगवी, भुसार, रामवाडी, भोजाडे, कानेगाव, वारी, सावळी विहीर, प्रवरानगर, राहाता, मंजूर तसेच नाशिक जिल्ह्यातील मानोरी, कानळद, शिरवाडे, वाकत, पानेवाडी, भवरी, भालूर, शिंगवे, नांदगाव, नगरसूल, वाईभूती, खरवंडी, भरवस, वाहेगाव, देशमाने, मुखेड तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील चोर, वाघलगाव, महांकाळ आणि वाडगाव परिसरातील असंख्य वारकरी भाविक सहभागी होणार आहेत.

ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून वारकरी संप्रदायातील एकात्मता, भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा आध्यात्मिक सोहळा मानला जातो. अनेक वर्षांची अखंड परंपरा जपत हा दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून दरवर्षी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दिंडीचे संस्थापक, मुख्य प्रवर्तक तथा मार्गदर्शक ह.भ.प. पांडुरंग बाबा भाकरे यांनी परिसरातील सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांना या पवित्र दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठलनामाचा आनंद लुटण्याचे तसेच सोहळ्याची शोभा वाढविण्याचे आवाहन केले आहे.

Tags: Atharv Wani
Previous Post

विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिके करपण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा संताप

Next Post

भोर–महाड वरंधा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post

भोर–महाड वरंधा घाट मार्गावर दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे ठप्प

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In