१५ व्या वित्त आयोगातून दोन लाखांचा निधी; ग्रामविकासाला नवी चालना
पारगाव | प्रतिनिधी
पारगाव ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने व १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या दोन लाख रुपयांच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र गावठाण सुशोभीकरण कामाचा शुभारंभ शनिवारी दि. ४ जुलै रोजी उत्साहात पार पडला. या विकासकामाचा शुभारंभ मा. श्री. महादेव नाथा देवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या सुशोभीकरण कामामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर अधिक स्वच्छ, सुंदर व नागरिकांसाठी सुविधायुक्त होणार असून ग्रामस्थांना आरोग्यदायी वातावरणाचा लाभ मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या विकासाभिमुख उपक्रमाचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या श्वेता किरण ढोबळे, उपसरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, रोहिणी देवडे, सुनिता ढोबळे, वीरेंद्र ढोबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने, सामाजिक कार्यकर्ते बजरंगशेठ देवडे, पत्रकार लक्ष्मण ढोबळे, साईनाथ गायकवाड, रामदास ढोबळे, शंकर राऊत, रोहिदास राऊत, बेबीताई लोंढे, अनिकेत ढोबळे तसेच ग्रामस्थ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आरोग्य केंद्र परिसराच्या सुशोभीकरणामुळे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
