• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | सातारा (वाई) | प्रतिनिधी

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मंगळवार (दि. 21 जुलै) रोजी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन राजश्री कला क्रीडा मंडळ, हातकणंगले (जि. कोल्हापूर) या संस्थेच्या नावाखाली सातारा जिल्ह्यात कथितरित्या जुगाराचे क्लब चालवले जात असल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

RelatedPosts

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भोसले नावाचे व्यक्ती स्वतःला राजश्री कला क्रीडा मंडळाचे सचिव म्हणून सांगत पत्त्यांच्या क्लबना संस्थेच्या शाखा देत असल्याचा आरोप आहे. सामाजिक संस्थेची नोंदणी समाजसेवेसाठी असते, जुगार व्यवसायासाठी नव्हे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच सातारा जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व कथित शाखा तात्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात जुगाराविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई झाली नाही, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिला.

निवेदन देताना राष्ट्रीय मजदूर सेनेचे सातारा जिल्हा संघटक विकास जाधव, वाई तालुकाध्यक्ष विजय सातपुते, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, अमर कांबळे, गणेश जायगुडे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

Related Posts

Blog

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026
0
Blog

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026
1
Blog

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

July 22, 2026
2
Blog

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

July 22, 2026
6
Blog

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

July 22, 2026
1
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 22, 2026
3

ताज्या बातम्या

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In