• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; श्री शिवाजी हायस्कूलमध्ये मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचा जनजागृती उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी हायस्कूल व प्राथमिक शाळा, कोकरपुरा येथे मुक्ताई व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य केंद्राच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्त राहण्याची सामूहिक शपथ घेतली.

RelatedPosts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य गौतम कोंडीबा आढाव, पर्यवेक्षक रवींद्र सखाराम चिंचोले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सुनील नागरगोजे, सौ. सुमन नागरगोजे, समुपदेशक गायकवाड मॅडम, पवार मॅडम, अविनाश शिपे आणि केंद्रातील सहकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसन म्हणजे काय, त्याचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे महत्त्व, चुकीच्या संगतीपासून सावध राहण्याची गरज आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

यावेळी परिसरातील व्यसनाधीन व्यक्तींची लक्षणे ओळखणे, त्यांना उपचारासाठी प्रोत्साहित करणे आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यात प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबतही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला बळी पडणार नाही तसेच कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची सामूहिक शपथ घेतली.

विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा बंदला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)चा पाठिंबा

Next Post

समाजकल्याण कार्यालयासमोरील कचराकुंडीचे हरितस्थळात रूपांतर; नागरिक, विद्यार्थी व महापालिकेचा आदर्श उपक्रम

Related Posts

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा
Blog

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026
8
Blog

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026
17
Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
42
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
14
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
4
Next Post

समाजकल्याण कार्यालयासमोरील कचराकुंडीचे हरितस्थळात रूपांतर; नागरिक, विद्यार्थी व महापालिकेचा आदर्श उपक्रम

ताज्या बातम्या

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

मानवत तालुक्यात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा

September 10, 2026

लातूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य निवडीची उच्चस्तरीय चौकशी करा

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In