• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परभणीतील १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना दिलासा; पीक विम्याचा मार्ग मोकळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेत विभागीय आयुक्तांनी पीक विमा कंपनीने दाखल केलेले सर्व आक्षेप (डिस्पूट) फेटाळून लावले आहेत. तसेच जिल्हाधिकारी, परभणी यांनी सादर केलेला अहवाल मान्य केल्याने जिल्ह्यातील १७ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे जांब, परभणी ग्रामीण, परभणी शहर, पेडगाव, पिंगळी, सिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, झरी, पिंपळदरी, राणीसावरगाव, पेठशिवणी, चुडावा, कावलगाव, लिमला, आवलगाव, सोनपेठ आणि वडगाव या महसूल मंडळांतील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयानंतर विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेऊन निर्णयाची माहिती घेण्यात आली. यावेळी एकनाथराव साळवे, विलासराव बाबर, रामभाऊ अरगडे यांच्यासह शिष्टमंडळ उपस्थित होते.

यापूर्वी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अहवालानुसारच पीक विमा मंजूर करण्याची भूमिका मांडण्यात आली होती. त्याच भूमिकेला मान्यता देत विभागीय आयुक्तांनी विमा कंपनीचे सर्व आक्षेप फेटाळले.

दरम्यान, सदर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी कृषीमंत्री, कृषी आयुक्त आणि प्रधान सचिव (कृषी) यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच सन २०२४ मधील दैठणा, टाकळी कुंभकर्ण आणि रावराजूर महसूल मंडळांतील प्रलंबित पीक विमा प्रकरणांबाबतही शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पीक विम्याच्या प्रश्नावर हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

Tags: Tirupati Dakhore
Previous Post

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

Next Post

श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी; ३० ते ३५ गावांच्या दिंड्या दाखल होणार

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
27
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
11
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
4
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
1
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
5
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
3
Next Post
श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी; ३० ते ३५ गावांच्या दिंड्या दाखल होणार

श्री क्षेत्र विठ्ठल माळावर आषाढी एकादशीनिमित्त जय्यत तयारी; ३० ते ३५ गावांच्या दिंड्या दाखल होणार

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In