• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

धडगाव : प्रतिनिधी

मोराणे (धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिनानिमित्त विचारप्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोराणे आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समाजकार्य पंधरवड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदिप देवरे, यंग फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते, धुळे, उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. डॉ. रघुनाथ महाजन, प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. सुदाम राठोड, प्रा. डॉ. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. प्रिती वाहने, प्रा. डॉ. सुवर्णा बर्डे, प्रा. डॉ. फरिदा खान तसेच ग्रंथपाल गजेंद्र जगदेव उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक संदिप देवरे यांनी विद्यार्थ्यांना ‘जाती सलोखा आणि सामाजिक शांतता’ या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या काळात जातीयवाद, धार्मिक तेढ, द्वेष आणि भेदभाव यांसारख्या समस्या समाजासमोर आव्हान ठरत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने इतरांच्या भावना व विचारांचा आदर करणे गरजेचे आहे. मतभेद असले तरी मनभेद होऊ नयेत, यासाठी संवाद, सहकार्य आणि परस्पर सन्मानाची भावना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी सद्भावना ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाली पाहिजे, असे सांगितले. सर्वांनी एकमेकांना मदत करून, भेदभाव टाळून आणि प्रेम व बंधुभावाने वागल्यास देशाची एकता व सामाजिक सलोखा अधिक मजबूत होईल, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. राहुल आहेर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील एसवाय बीएसडब्ल्यू आणि एफवाय बीएसडब्ल्यूचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. राहुल आहेर तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Vasant Pawara
Previous Post

तांभा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रमोद मडावी यांची बिनविरोध निवड

Next Post

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In