• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

निवळी : प्रतिनिधी

सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी येथे विद्यार्थ्यांना दुर्मिळ रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे औषधी महत्त्व समजावे तसेच रानभाज्यांपासून विविध पदार्थ तयार करण्याच्या पद्धतींची माहिती मिळावी, या उद्देशाने सृष्टीज्ञान संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सई शेखरजी निकम, शालेय समिती सदस्य मनोहरजी महाडिक, सृष्टीज्ञान संस्थेचे मार्गदर्शक व मियावाकी प्रकल्प मार्गदर्शक प्रशांतजी शिंदे, प्रकल्प सहकारी ओंकार परकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दळवी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या रानभाजी महोत्सवात विद्यालयातील तसेच इंग्लिश मीडियम विभागातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी जवळपास ४० प्रकारच्या रानभाज्यांपासून विविध पदार्थ तयार करून त्यांचे औषधी महत्त्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

महोत्सवात लहान व मोठ्या अशा दोन गटांमध्ये एकूण ४० गटांनी सहभाग नोंदवला. लहान गटात प्रथम क्रमांक पिंपळ गट, द्वितीय अडुळसा गट आणि तृतीय चंदन व पारिजातक गटाने मिळवला. तर मोठ्या गटात प्रथम वड गट, द्वितीय शेवगा गट आणि तृतीय लाल चंदन व कोकम गटाने मिळवला. विजेत्या गटांना सृष्टीज्ञान संस्थेच्या वतीने पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी सई शेखरजी निकम यांनी विद्यालयाने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनोहरजी महाडिक आणि प्रशांत शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सरमळकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. व्ही. आर. सावंत यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक जैवविविधता, पारंपरिक आहारपद्धती आणि पर्यावरण संवर्धनाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व उपयुक्त ठरला.

Ad 1
Previous Post

बांबवड्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा; रात्रीच्या वेळी रुग्णांचे हाल, प्रशासन सुस्त!

Next Post

एलकेएएमएच रुग्णालयात तिहेरी गर्भधारणेची यशस्वी प्रसूती; दोन मुली आणि एका मुलाचा जन्म

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
10
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
13
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
11
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
4
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
37
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
11
Next Post

एलकेएएमएच रुग्णालयात तिहेरी गर्भधारणेची यशस्वी प्रसूती; दोन मुली आणि एका मुलाचा जन्म

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In