• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका बायजा बारगजे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी :

पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली परिसरात वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी वर्गाला होत असलेला त्रास लक्षात घेऊन नगरसेविका सौ. बायजा बबन बारगजे यांच्या पुढाकारातून झाडांची आवश्यक छाटणी करण्यात आली. या कार्यवाहीमुळे रस्ते व पादचारी मार्ग मोकळे होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

कळंबोली येथील केएल-४ परिसरातील विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर तसेच विद्युत वाहिन्यांच्या दिशेने वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. नागरिकांनी ही बाब नगरसेविका बायजा बारगजे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून झाडांच्या छाटणीची कार्यवाही करून घेतली.

या कामाच्या वेळी भाजपा नेते बबन बारगजे यांनी दिवसभर प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. परिसरातील नागरिक महेंद्र खबाले, वैभव फाळके तसेच व्यापारी वर्गाशी समन्वय साधत छाटणीचे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. महानगरपालिकेचे सुपरवायझर आतिश चौधरी यांच्या समन्वयाने ही कार्यवाही करण्यात आली.

छाटणीसाठी आवश्यक वाहने व साधनसामग्री घटनास्थळी उपलब्ध करून देण्यासोबतच कामात अडथळा निर्माण करणारी वाहने हटविण्यासाठीही बबन बारगजे यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करणे सुलभ झाले आणि छाटणीचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले.

या कार्यवाहीमुळे केएल-४ परिसरातील रस्ते व पादचारी मार्ग मोकळे झाले असून विद्युत वाहिन्यांच्या जवळ वाढलेल्या फांद्यांमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका कमी झाला आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या कामाचा फायदा झाला आहे.

“नागरिकांच्या समस्या केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून सोडविण्याला प्राधान्य आहे. परिसरातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे भाजपा नेते बबन बारगजे यांनी सांगितले.

या कार्यवाहीबद्दल केएल-४ परिसरातील नागरिक व व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त करत नगरसेविका बायजा बबन बारगजे आणि भाजपा नेते बबन बारगजे यांचे आभार मानले.

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

Next Post

फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग

फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In