• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञा प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन..!
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण
“मराठी सारस्वतावर शोककळा डॉ.यास्मिन शेख (२१ जून १९२५ – २४ ऑगस्ट २०२६) या मराठी भाषेच्या अत्यंत प्रसिद्ध आणि ज्येष्ठ व्याकरण-तज्ज्ञ, लेखिका व भाषाशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन मराठी भाषेचे नियम सुलभ करण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी समर्पित केले होते. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली.मराठी भाषेचा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या, व्रतस्थ वृत्तीने व्याकरण आणि भाषाशास्त्रासाठी आपले जीवन वाहून घेतलेल्या ज्येष्ठ अध्यापिका, लेखिका प्रा. यास्मिन शेख यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी भाषा, साहित्य आणि शिक्षण क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

त्या ज्येष्ठ साहित्यिक प्रा.श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी शाळा आणि महाविद्यालयात तब्बल 34 वर्षे अध्यापन केले. मुंबईच्या शिव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात त्यांनी सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून आपली सेवा बजावली.
त्यांनी शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर’ मध्ये आयएएस परीक्षेच्या विद्यार्थ्यांना 10 वर्षे व्याकरण व भाषाशास्त्राचे मार्गदर्शन केले. “भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे; तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,” हा विचार त्यांनी आयुष्यभर जपला आणि रुजवला.

बालभारतीला दिले अमूल्य योगदान
बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकांचे त्यांनी इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरण’ या गाजलेल्या पुस्तकाच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या.त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने त्यांना डॉ.अशोक केळकर सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले होते.यास्मिन शेख यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.
*ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.महाराष्ट्र भूषण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलासराजे घरत यांनी दुख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Ad 1
Previous Post

वेळापूरच्या मातीतून परिवर्तनाचा जयघोष! 🚩

Next Post

वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

वाई तालुक्यातील शिरगाव येथे धम्म राज सामाजिक संस्थेची दिमाखात स्थापना! शिरगावत उत्साही वातावरण!

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In