ऑक्टोंबर सेवा सप्ताह निमित्त लायन्स क्लब ऑफ पेण प्राइड व श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट खारपाडा- ठाकूरपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने व स्टोन क्रेशर वेल्फेअर असोशिएशन यांच्या विशेष सहकार्याने व संपर्क अधिकारी एम.जे.एफ.लायन श्री. शशिकांत पुंडलिक भगत आणि श्री .स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट चे अधक्ष्य श्री. शशिकांत काशिनाथ ठाकूर यांच्या पुढाकाराने बुधवार दिनांक- २.१०.२०२४ महात्मा गांधी जयंतनिमित्त श्री स्वयंभू शिवमंदिर समाजहॉल खारपाडा – ठाकूरपाडा येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे नियोजन हे श्री शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट व सदस्य यांचे होते.
विशेष अतिथी म्हणून एम जे एफ लायन संजय सूर्यवंशी प्रथम उपप्रांतपाल यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. संदीप बागुल साहेब पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांनी केले. यावेळी ग्रूपग्रामपंचायत खारपाडा सरपंच सौ.नेत्रा महेंद्र घरत, सदस्या सौ. रसिका रामचंद्र ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. डी.बी.पाटील , बळवली गावाच्या सरपंच सौ.उज्वला समाधान पाटील, उद्योगपती मधुकर भगत, माजी सरपंच धनाजी पुंडलिक भगत ,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष नागा ठाकूर, अंकुश ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात आरोग्य तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डायबिटीस चेकअप, दंतचिकित्सा, ब्रेस्ट व गर्भाशय मुख कॅन्सर चिकित्सा या सर्व मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच विविध आजारांवरती मोफत औषध वाटप करण्यात आली.
या शिबिरात जवळपास ९५ नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या व १५ नागरिकांवर मोतीबिंदू व इतर आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच श्री स्वयंभू शिवमंदिर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनकर जगन्नाथ ठाकूर, खजिनदार गोपीनाथ बाळकृष्ण ठाकूर, सचिव हर्षद धाऊ ठाकूर ,उपसचिव महेंद्र परशुराम ठाकूर, सदस्य संतोष महादेव ठाकूर, महादेव काशिराम घरत, नारायण मंगल्या घरत, अशोक भगत, मधुकर धा. ठाकूर, भालचंद्र मं. ठाकूर, सतीश ठाकूर कृष्णा बा. मोरे, अंकुश ठाकूर, प्रवीण घरत, रामकृष्ण ठाकूर ,राजाराम ठाकूर विश्वनाथ मोरे, पी.पी. मोरे, मनोहर ठाकूर, बाळू घरत, प्रशांत घरत, प्रकाश कांबळे, प्रदीप म्हात्रे, अनंता पाटील, रमेश कांबळे, तुलशिदास कांबळे, राजा पाटील यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे महिला मंडळ ठाकूरपाडा ह्यांच्या पुढाकाराने दुपारी जेवणासाठी तांदळाच्या भाकरीची व्यवस्था करण्यात आली..
Discussion about this post