ग्रामपंचायत कार्यालयासह एकतानगर अंगणवाडीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन
राहुल चव्हाण -प्रतिनिधी झारगडवाडी , बारामती : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती झारगडवाडी गावात उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत झारगडवाडी कार्यालय तसेच एकतानगर येथील अंगणवाडीमध्ये राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
ग्रामपंचायत झारगडवाडी येथे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर अंकुश निकम व निलेश कालगांवकर यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मा. सदस्य राहुल साळुंके, मंगेश मासाळ, हनुमंत झारगड, निलेश कालगांवकर, अवि जाधव, कोकणे नवनाथ, बोरकर अमर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल माने, अमोल बिचकुले, आदित्य आवटे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य, त्याग व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.
तसेच एकतानगर येथील अंगणवाडीमध्ये जय मल्हार संघटनेचे सरचिटणीस सोमनाथ मदने व उपसरपंच सोनाली चव्हाण यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी माने मॅडम तसेच परिसरातील मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त गावातील विविध ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उपस्थितांनी त्यांच्या शौर्यपूर्ण इतिहासाचे स्मरण करून युवा पिढीने त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.













