• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
शहाद्यात विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

RelatedPosts

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

शहादा,दि.०७(प्रतिनिधी)
तालुका व शहरातील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना हा गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष असून, शहादा तालुक्यात पक्षाचे संघटन जोमाने वाढत आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिवसेना नेते तथा आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.
शहादा येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या कार्याने प्रभावित होऊन नांदिया, तलावडी, दुधखेडा, कुसुमवाडा व शहादा येथील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. रामभैय्या रघुवंशी, शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल, शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे, महिला सेनेच्या जिल्हाप्रमुख सौ. ज्योतीताई राजपूत, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मोहितसिंग राजपूत, ज्येष्ठ नेते जहीर शेख, सुपडू खेडकर, शेतकरी सेनेचे नगिनभाई पाटील, सचिन पाटील, काशिनाथ पाटील, डॉ.राजेंद्र पेंढारकर, सौ. संगीता पवार, नंदाताई सोनवणे, भावना लोहार, गायत्री भामरे आदी उपस्थित होते.तालुक्यातील सुजित शेवाळे, कैलाश पवार, श्रवण सुळे, दिलीप पवार, प्रवीण शिंपी, धरमसिंग पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हाप्रमुख अॅड. रामभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात शिवसेना पक्षाचा गमछा टाकून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार रघुवंशी यांनी सांगितले की, शिवसेना हा सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करणारा पक्ष आहे.

शहादा तालुका व शहरातील पदाधिकारी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहेत. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळत असून आगामी काळात संघटन अधिक मजबूत होईल.हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे व जयसिंग ठाकरे यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हितेंद्र वर्मा, गोपाल कोळी, हेमंत सूर्यवंशी, जगदीश पाटील, महेश पाटील, एकनाथ ठाकरे, लक्ष्मण पवार, मुरलीधर वळवी, कौतुभ मोरे, अॅड. लव लोहार, धनराज जायसवाल, दीपक मोरे, राकेश पाटील, सागर चौधरी, योगेश कोठारी, मनोज बेदमुथा आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शहादा तालुकाप्रमुख मनलेश जायसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहादा शहरप्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अॅड. भोजेंद्र शिंदे यांनी केले. यावेळी युवा सेनेचे राजरत्न बिरारे, जगदीश पवार, प्रवीण सैंदाणे, गुलाब सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Previous Post

पारोळ्याच्या ‘परिश्रम’ दिव्यांग निवासी शाळेत दहीहंडीचा उत्साह; बाल गोपाळांच्या थरांनी जिंकली मने!

Next Post

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

Related Posts

Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
Blog

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
0
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
Blog

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
0
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा
Blog

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

September 7, 2026
4
Blog

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

September 7, 2026
3
बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात
Blog

बोडखा तांड्यात बंजारा समाजाचा ऐतिहासिक तिजोत्सव उत्साहात

September 7, 2026
0
Next Post
मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

ताज्या बातम्या

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In