सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, गुणवंतांचा सन्मान अन् खानदेशी मनोरंजनाची मेजवानी.
खान्देश विकास मंडळ तर्फे आयोजित विविध उपक्रमांना उत्तम प्रतिसाद.
उरण, दि. ७ (विठ्ठल ममताबादे) — “नाते मातीशी” या भावनेला केंद्रस्थानी ठेवत खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘खान्देश महोत्सव २०२६’ हा विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि स्नेहपूर्ण उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उरण येथील भारती बँक्वेट हॉल, करंजा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमाला खानदेशी समाजबांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा, खान्देशी डॉक्टरांचा तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशशेठ बालदी, जेएनपीटीच्या जनरल मॅनेजर (एडमिन) मनीषा जाधव, लहास ग्रीन इंडिया प्रा. लि.चे डायरेक्टर गुलाबराव जाधव, माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पत्नी कल्पना संजीवजी नाईक, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती मधु दौलतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या (उरण) प्रेरणा जितेंद्र घरत, मोरा-उरणचे पोलीस निरीक्षक (क्राईम) राहुल काटवानी, कोपरखैरणे (नवी मुंबई) नगरसेविका मिनाक्षी किशोर पाटील, पंचायत समिती सदस्य (उरण) कैलास मोरेश्वर भोईर, नवजीवन लोक विकास संस्थेचे (कल्याण) अध्यक्ष किशोर तुमडू पाटील, तसेच गाडी लोहार समाज उन्नती मंडळ (कल्याण)चे अध्यक्ष ऍड.युवराज मुरार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून ‘महाराष्ट्र ट्रीपल केसरी’ तथा महाराष्ट्राचे ‘सिंघम’ म्हणून सुपरिचित असलेले पैलवान तथा न्हावा शेवा पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी, महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य (भाजप) तथा उरण नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान खान्देशी हास्यकलाकार, नकलाकार व निवेदक-अभिनेते विलासकुमार शिरसाठ यांच्या विशेष खान्देशी मनोरंजन कार्यक्रमाने उपस्थितांची चांगलीच करमणूक केली.
या महोत्सवाच्या आयोजनामध्ये खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, सचिव सचिन खैरनार, उपाध्यक्ष आनंद कुमावत, खजिनदार वामनराव राठोड, सदस्य भरत पाटील, महिला सदस्य जयश्री महाजन, सभासद डॉ. रविंद्र पाटील, दुर्गेश महाले, रविंद्र सूर्यवंशी, ईश्वर माळी, विजय नगराळे, उपाध्यक्ष कैलास भामरे, सल्लागार संजय पाटील, सदस्य संदीप पाटील, महिला सदस्य राजश्री मोरे, सभासद सुनील झोपे, दिनेश पाटील, भगवान राठोड, गोकुळ धाडी आणि मनोज चव्हाण यांचा सहभाग राहिला.दुपारनंतर उपस्थितांसाठी सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून खान्देशी समाजबांधवांनी आपली संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश दिला.खान्देश विकास मंडळ, उरण हे नोंदणीकृत मंडळ असून या मंडळातर्फे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या महोत्सवातून करण्यात आला.
एकूणच ‘नाते मातीशी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा हा खानदेश महोत्सव २०२६ सामाजिक एकोपा, संस्कृती आणि स्नेहाचा सुंदर संगम ठरला. मान्यवरांची उपस्थिती, गुणवंत व ज्येष्ठांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक भोजन आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाले.





