• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 7, 2026
in Blog
0
विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्था मर्यादित विंधणेची स्थापना.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

उरण दि ७(विठ्ठल ममताबादे ) रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुक्यातील विंधणे कोळीवाडा येथे एकविरा आई प्रसन्न वि. का. सहकारी संस्था मर्यादित विंधणे कोळीवाडा या सहकारी संस्थेचा उद्घाटन समारंभ मोठे उत्साहात कुलदैवत मंदिरासमोरील पटांगणात पार पाडला.

RelatedPosts

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

कोळीवाड्यातील स्थानिक मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी व गोरगरीब मच्छीमारांना शासनाच्या विविध सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दिघोडे कांदळवन समितीचे अध्यक्ष व पारंपारिक मच्छीमार संस्थेचे सेक्रेटरी प्रितेश काशिनाथ कोळी यांच्या प्रास्ताविक पर भाषणाने झाले त्यामध्ये त्यांनी संस्थेच्या स्थापनेच्या उद्देश आणि रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.

या भव्य कार्यक्रमासाठी उद्घाटक व मार्गदर्शक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पारंपरिक मच्छिमार बचाव व सामाजिक कृती समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभ्यासक रमेश भास्कर कोळी यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून उपस्थित मच्छीमार बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले व संस्थेच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी गव्हाण सहकारी संस्थेचे चेअरमन हितेश कोळी हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मच्छीमारांच्या सहकार्याबद्दल महत्त्वाचे विचार मांडले व कोळी बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना विषयी मार्गदर्शन केले तसेच दिघोडे पारंपारिक मच्छीमार संस्थेचे चेअरमन अशोक कोळी, कुंडेगाव सहकारी संस्थेचे पदाधिकारी भानुदास कोळी, तानाजी कोळी,गव्हाण मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी भरत कोळी, प्रकाश कोळी, वैभव कोळी या सोहळ्याला उपस्थित राहून संस्थेला मार्गदर्शन करून पाठबळ दिले.

विंधणे खालचा पाडा गावचे अध्यक्ष कृष्णा माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य मनीषा कोळी, संस्थेचे सचिव आशिष कोळी, संस्थेचे खजिनदार शैलेश कोळी, संस्थेतील पदाधिकारी कृष्णा कोळी, सतीश कोळी, पंकज कोळी,आर्यन कोळी,संतोष कोळी, विनोद कोळी,राजेश कोळी, विनायक कोळी,अर्चना कोळी, धनश्री कोळी, शर्मिला कोळी,अस्मिता कोळी, उज्वला कोळी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी सदस्य यासोबतच गावचे ग्रामस्थ पदाधिकारी व परिसरातील मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण व नेटके सूत्रसंचालन रुपेश पाटील सर यांनी आपल्या सुमधुर वाणीतून संपूर्ण सोहळ्यात रंगत आणली. विंधणे एकविरा आई प्रसन्न मच्छीमार सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक चेअरमन सुनील बाळाराम कोळी यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व जमलेल्या ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. विंधणे कोळीवाडा येथे पार पडलेल्या या यशस्वी सोहळ्यामुळे परिसरातील मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

मळद विकास सेवा सोसायटीचा महत्त्वपूर्ण निर्णय; PDCC बँक निवडणुकीसाठी शरद विलास जाधव प्रतिनिधी

Next Post

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

Related Posts

Blog

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026
1
Blog

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
1
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!
Blog

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026
0
चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात
Blog

चांदवड तालुक्यात ११५ गावांमध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
0
चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा
Blog

चिमुकल्यांचा समाजसेवेचा आदर्श; रस्त्यावरील खड्डा बुजवून वाहनधारकांना दिला दिलासा

September 7, 2026
4
Blog

मुलींना मोफत शिक्षण’ फक्त घोषणेतच ? महाविद्यालयातील शुल्कप्रश्नी पालक संतप्त !.

September 7, 2026
3
Next Post
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात संपन्न.

ताज्या बातम्या

स्वातंत्र्याची पहिली मशाल पेटविणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक

September 7, 2026

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचा प्रशासनास विसर! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बेमुदत धरणे आंदोलन

September 7, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

तीन दिवसांपासून बेपत्ता अजिंक्य शिलदणकर गोतेश्वर तलावात मृतदेह!

September 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In