• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
46
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीगोंदा, दि. २३ (प्रतिनिधी) : श्रीगोंदा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पेडगाव व लगतच्या नदीकाठच्या शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना तसेच रात्रीच्या वेळी बिबट्या दिसून आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून, त्यामुळे शेतमजूर व स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पेडगाव परिसर भीमा नदीच्या काठावर असून या भागात मोठ्या प्रमाणावर उसाची शेती आहे. मुबलक पाणी, घनदाट ऊस क्षेत्र तसेच भटकी कुत्री व शेळ्यांसारखे सहज उपलब्ध होणारे खाद्य यामुळे बिबट्याचा वावर या परिसरात वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात. गेल्या काही दिवसांपासून शिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

RelatedPosts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

सध्या शेतांमध्ये खुरपणी, पाणी देणे आणि मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर येण्यास घाबरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह पहाटे दूध संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वावराची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाला सतर्क केले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पेडगाव शिवारात तातडीने पिंजरा लावावा तसेच रात्रीच्या वेळी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी शक्यतो एकटे शेतात जाणे टाळावे, सोबत टॉर्च ठेवावी, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्यास त्याला चिथावणी देऊ नये किंवा दगडफेक करू नये. त्याऐवजी तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Ad 1
Previous Post

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Next Post

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

Related Posts

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात
ताज्या घडामोडी

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
6
स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
ताज्या घडामोडी

स्मार्ट मीटर बसवा, जुने मीटर कॅनॉलवर फेकून द्या! महावितरणाच्या कारभारावर ग्राहकांचा संताप

November 7, 2026
17
हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!
ताज्या घडामोडी

हिंगणघाटात रात्री ११ नंतर उपचारांची वानवा; आपत्कालीन रुग्णांचे हाल!

November 7, 2026
28
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
ताज्या घडामोडी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 7, 2026
7
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
ताज्या घडामोडी

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
4
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
24
Next Post
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In