सातारा/ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या माता भीमाबाई आंबेडकरांच्या सातारा येथील भिमाईभुमी स्मारक उभारणीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लवकरच आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून लवकर भिमाई भूमीत महामाता भीमाबाई अंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.
आज सातारा येथील भीमाई भूमीला ना.रामदास आठवले यांनी सपत्नीक भेट दिली यावेळी भीमाई भूमी चे संरक्षण करून माता भीमाबाई आंबेडकरांच्या स्मारकासाठी अनेक वर्षे प्रयत्नशील असणारे साहित्यिक पार्थ पोळके यांच्या नेतृत्वात भीमाई स्मारकासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
या वेळी नाः रामदासजी आठवले साहेब यांचे कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतिने तसेच जिल्हा सचिव सतिश (दादा) माळगे यांच्या कडून पुष्प हार घालून स्वागत कऱण्यात आले.
या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे प्रदेशाध्यक्ष, स्वागत अध्यक्ष मा. अशोक (बापू) गायकवाड जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा
निमंत्रक मा. सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा.अविनाश महातेकर, कोल्हापूर जिल्हा सचिव सतीश माळगे, यांच्या सह संपूर्ण महाराष्ट्र तसचेच देशातून रिपब्लीकन पक्षाचे वरिष्ठ पदाअधीकारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्षा, सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थिती होतें.
Discussion about this post