• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बालगंगा धरण पुनर्वसनासाठी २९ सप्टेंबरला मंत्रालयात तातडीची बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in Blog
0
बालगंगा धरण पुनर्वसनासाठी २९ सप्टेंबरला मंत्रालयात तातडीची बैठक
0
SHARES
141
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा; पेण-पालीचे आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून बैठक, शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याचाही उल्लेख

पेण : वार्ताहर

RelatedPosts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बालगंगा धरण प्रकल्पाच्या पुनर्वसनासह प्रलंबित विविध प्रश्नांबाबत मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जलसंपदा विभाग व संबंधित यंत्रणांच्या निर्देशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून, पेण-पाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या माध्यमातून बैठकीसाठी पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या बैठकीसाठी मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, संबंधित सचिव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, कोकण पाटबंधारे विभाग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच संबंधित अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत निमंत्रित करण्यात आले आहे.

गागोदे खुर्द व निधवली गावांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही बैठकीत महत्त्वाचा ठरणार असून, सिडकोमार्फत या गावांच्या पुनर्वसनाबाबत कार्यवाही हाती घेण्यासंदर्भातील मान्यता पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच दोन्ही गावांचा प्रारूप आराखडाही तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

बालगंगा धरण प्रकल्पाच्या पुनर्वसनाबाबत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांमध्ये गावठाणातील घरांची मिळकत, पुनर्वसनाची प्रक्रिया आणि इतर प्रलंबित मागण्यांचा समावेश आहे. या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, रायगड जिल्हा भाजप नेते शिवाजी पाटील यांनीही बालगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी दीर्घकाळ पाठपुरावा केल्याचे प्रकल्पग्रस्त व संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या पाठपुराव्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि बालगंगा धरण प्रकल्प संघर्ष समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.

बैठकीची टिपणी संबंधित मंत्री कार्यालयास सादर करण्याच्या तसेच बैठक झाल्यानंतर दोन दिवसांत बैठकीच्या इतिवृत्ताचे प्रारूप मंत्रीमहोदयांच्या मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मंत्रालयात तातडीची बैठक निश्चित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बालगंगा धरण प्रकल्प संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नांना आता गती मिळेल, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Tags: Pradip Satane
Previous Post

अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी

Next Post

मुलगी आहे म्हणून अभिमान आहे!

Related Posts

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
Blog

शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला काळ्याची वाडीतील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

November 12, 2026
72
Blog

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गामुळे आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुसाट

November 12, 2026
3
समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!
Blog

समर्पण ग्रुप – माणुसकीचा दीप उजळवणारा अनोखा सेवायज्ञ!

November 12, 2026
13
सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!
Blog

सिगालोवाद सुत्ताच्या माध्यमातून गृहस्थ जीवनाला धम्माची दिशा!

November 12, 2026
17
बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम
Blog

बचतीतून गोडवा, एकीतून दिवाळी! एरंडोलीच्या गरुडझेप महिला ग्रामसंघाचा प्रेरणादायी उपक्रम

November 11, 2026
15
सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप
Blog

सालोरा–धोत्रा मार्गावर एसटी बस नाल्यात उलटली; २२ प्रवासी सुखरूप

November 11, 2026
62
Next Post

मुलगी आहे म्हणून अभिमान आहे!

ताज्या बातम्या

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शहाद्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’!

November 12, 2026
अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

अष्टविनायकांचा कायापालट! महाडच्या वरदविनायक मंदिरात विकासकामांना वेग

November 12, 2026
सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

सहकार विकास आघाडीच्या बळावर जिल्हा बँकेत नवे नेतृत्व!

November 12, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In