काँग्रेसच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी; विविध जिल्ह्यांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर
करमाळा : प्रतिनिधी
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग समन्वयकपदी उस्मानशेठ तांबोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक विभागाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच समाजातील विविध घटकांशी संवाद साधणे, अशी संघटनात्मक जबाबदारी तांबोळी यांच्यावर राहणार आहे.
तांबोळी यांच्या नियुक्तीचे काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक कार्याला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




