शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलती व मदतीचा मार्ग मोकळा
रिसोड (प्रतिनिधी) : खरीप हंगामातील पिकांचे नुकसान व शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे याबाबत मागणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची विनंती केली होती.
शासनाने रिसोड तालुक्यात दुष्काळी उपाययोजना लागू केल्याने शेतकऱ्यांना विविध शासकीय सवलती व मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार रिसोड हा दुष्काळाच्या Trigger-1 अंतर्गत समाविष्ट तालुक्यांपैकी एक आहे.
या निर्णयाबद्दल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आभार मानले.








