• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 29, 2026
in Blog
0
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुंबईत निवेदन; पावसातील खंड, पाणीटंचाई व पीकस्थितीचा मुद्दा मांडला

चांदवड : तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर चांदवडचा महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळसदृश ‘Trigger-1’ यादीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी चौधरी यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चांदवड तालुक्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी ‘Trigger-1’ यादीत तालुक्याचा समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

यंदा तालुक्यात पावसाची अनिश्चितता तसेच पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक शेतकरी पावसावर अवलंबून असून काही भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी वाढल्याचे चौधरी यांनी निदर्शनास आणून दिले.

तालुक्यातील प्रत्यक्ष पर्जन्यस्थिती, पिकांची अवस्था आणि शेतकऱ्यांचे नुकसान यांचा आढावा घेऊन ‘Trigger-1’ अंतर्गत चांदवडचा समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे पुढील दुष्काळ मूल्यांकन प्रक्रिया आणि लागू होणाऱ्या उपाययोजनांच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मदत मिळू शकते, असा मुद्दाही मांडण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे भाऊसाहेब चौधरी यांनी सांगितले. यावेळी राज्याचे मंत्री दादा भुसे तसेच माजी आमदार धनराज महाले उपस्थित होते.

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करण्याची मागणी विविध स्तरांवरून पुढे येत असल्याने शासन याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

Next Post

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
पिकुळे बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा
Blog

पिकुळे बंधाऱ्यांच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास २३ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा

September 29, 2026
14
Next Post

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In