• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश; जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे, प्रत्येक ग्रामपंचायतीत २५ जलतारा उभारणीचे उद्दिष्ट

सिंधुदुर्ग, दि. २९ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि आगामी काळातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलपुनर्भरण, पाणीसाठा निर्मिती व पाणी बचतीच्या उपाययोजनांना गती देण्यासाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे उभारण्याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये २५ जलतारा निर्माण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ही कामे जास्तीत जास्त लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

RelatedPosts

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील तरिणी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, मनोज भोगटे, ग्रामीण पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच विविध समन्वय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जलतारा व वनराई बंधारे उभारणीची कामे मोहीम स्वरूपात राबवून त्यांना गती देण्याच्या सूचना दिल्या. लोकसहभागातून जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जलसंधारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी सनियंत्रण अधिकारी नियुक्त करून अभियानाच्या कामांना गती देण्याची सूचना केली. जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रके व इस्टिमेट तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले. दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरत्या उपाययोजना करून संबंधित बंधारे पाणीसाठवणुकीसाठी उपयोगात आणता येतील का, याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

२ ऑक्टोबरची ग्रामसभा ठरणार महत्त्वाची

येत्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावातील टंचाई परिस्थितीवर सविस्तर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच व्हीबी-जी रामजी योजनेअंतर्गत आवश्यक कामांबाबत चर्चा करून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. आगामी टंचाईची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक गावाने स्थानिक गरजेनुसार जलसंधारण आणि पाणी उपलब्धतेचे नियोजन करावे, असे स्पष्ट करण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून तयार करण्यात येणाऱ्या टंचाई आराखड्यात जलस्रोत बळकटीकरणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. वनविभागामार्फत सुरू असलेल्या बंधारे निर्मितीच्या कामांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली.

डोंगरमाथ्यावरील भागात जास्तीत जास्त वनराई बंधारे उभारण्याबरोबरच यापूर्वी उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांमधील गाळ व माती काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या. वन्यजीवांसाठी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच अस्तित्वातील जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यावरही भर देण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व जलस्रोत व पाणीसाठ्यांची सद्यस्थिती दर्शविणारी आकडेवारी संबंधित विभागांनी दैनंदिन स्वरूपात एकत्रित करून उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. जलसंधारणाची कामे, लोकसहभाग आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर यांच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
2
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
2
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
6
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
5
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली
ताज्या घडामोडी

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026
8
ताज्या घडामोडी

ठाणगाव, पाटोदा आणि कानडी शिवारातील गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

September 30, 2026
14
Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In