• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in Blog
0
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

हेक्टरी लाखोंची तातडीची मदत, विद्यार्थ्यांची फी माफी, चारा डेपो सुरू करण्यासह प्रलंबित नुकसानभरपाई देण्याची मागणी

आष्टी : प्रतिनिधी

RelatedPosts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे

दुष्काळामुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखो रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शेतमजुरांना हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी

दुष्काळाचा परिणाम शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही होत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी. तसेच हॉस्टेल आणि मेससाठी शासनाने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

पशुधनासाठी चारा डेपो सुरू करा

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने चारा डेपो सुरू करावेत किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावर चारा अनुदान जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने द्या

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेती, पिके, जनावरे आणि विहिरींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप प्रलंबित असल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच अतिवृष्टीमुळे घरे आणि दुकानांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना काही प्रमाणात मदत मिळाली असली तरी उर्वरित नुकसानभरपाईचे अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. संबंधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आंदोलनस्थळ : धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड
दिनांक : गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी १० वाजता
आयोजक : शेतकरी मित्र विजय (अण्णा) गाढवे, तालुका अध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट

Tags: Natwar Mahajan
Previous Post

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

Next Post

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

Related Posts

Blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026
9
मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा
Blog

मराठवाडा मुक्ती दिन उत्साहात साजरा

September 30, 2026
6
दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न
Blog

दिघोडे येथे वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न

September 30, 2026
5
मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट
Blog

मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट

September 30, 2026
8
माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण
Blog

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026
9
Blog

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
10
Next Post

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत आर.वाय.पी. कला महाविद्यालयाचे उत्कृष्ट प्रदर्शन

September 30, 2026

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धामणगावात गुरुवारी आंदोलन

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In