• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

३३ ओबीसी जातींच्या केंद्रीय ओबीसी सूचीतील समावेशासाठी पुढील रणनीतीवर होणार चर्चा

उरण, दि. २ : महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जाती व समाज समूहांचा केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उरण, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. कराडी समाजाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

RelatedPosts

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

या बैठकीत संबंधित ओबीसी समाजांना केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आलेली निवेदने, बैठका, पत्रव्यवहार तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

विशेषतः केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये संबंधित समाजांचा समावेश करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्याबाबत तसेच या विषयावर विविध ओबीसी समाज संघटनांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून या मागणीसाठी दिल्ली तसेच महाराष्ट्रात विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित समाजांना केंद्र शासनाच्या शैक्षणिक प्रवेश, केंद्रीय सरकारी नोकऱ्या, शिष्यवृत्ती तसेच इतर केंद्रस्तरीय योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या ओबीसी सुविधांचा लाभ मिळावा, हा या प्रयत्नांचा प्रमुख उद्देश असल्याचे समितीने सांगितले.

या कार्यकारिणी बैठकीस महाराष्ट्रातील विविध ओबीसी समाजांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, बैठकीत पुढील कृती आराखड्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

बैठकीचे ठिकाण : हॉटेल आनंदी, रेल्वे स्टेशनजवळ, उरण, जिल्हा रायगड
दिनांक : रविवार, ४ ऑक्टोबर २०२६
वेळ : दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत

महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे तसेच कराडी समाज संघटनेच्या वतीने संबंधित सर्व पदाधिकारी व प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून आपले विचार व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Vitthal Mamtabade
Previous Post

नोटीस काढूनही ग्रामसभा टळली; ग्रामसेवक संघटनेच्या बहिष्काराचे कारण पुढे

Next Post

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026
0
बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू
ताज्या घडामोडी

बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

October 2, 2026
9
रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

October 2, 2026
5
बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप
क्राईम

बंदुकीच्या धाकावर अकोल्यातील युवकाला लुटल्याचा आरोप

October 2, 2026
62
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
Next Post

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सरस्वती विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

October 2, 2026
कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

कुऱ्हा-मांडवा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या २५ वर्षांनंतरही प्रलंबित

October 2, 2026

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In