• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवल्यात पोलिसांची मोठी कारवाई; ५,०६५ जिलेटिन कांड्या व १,५९५ डिटोनेटर जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

शासकीय परवानगीशिवाय स्फोटकांचा साठा केल्याचा आरोप; एकाला अटक, दोघे फरार

येवला : प्रतिनिधी

RelatedPosts

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

जोशीवस्ती आठवडे बाजारात मनमानी वसुलीचा आरोप; ग्रामपंचायतीच्या नोटिसांनाही केराची टोपली?

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील वाईबोथी येथे दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATF) नाशिक युनिटने आणि येवला तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला. साई मातोश्री स्टोन क्रशर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ५ हजार ६५ जिलेटिन कांड्या आणि १ हजार ५९५ व्यावसायिक डिटोनेटर असा साठा पोलिसांच्या हाती लागला.

खदाणीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानगीशिवाय हा स्फोटकांचा साठा ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस शिपाई सचिन दराडे यांच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात नितीन भास्कर गायकवाड (रा. अंगणगाव), भगवान सुरेश वाघ (रा. वाईबोथी) आणि शरद आप्पासाहेब भड (रा. धामोडे) अशी तीन संशयितांची नावे समोर आली आहेत.

यापैकी भगवान सुरेश वाघ याला पोलिसांनी अटक केली असून नितीन गायकवाड आणि शरद भड हे दोघे फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा नेमका कुठून आणण्यात आला, त्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि या साठ्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. पुढील तपासात या प्रकरणातील इतर बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Tags: Janardhan Jadhav
Previous Post

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

Next Post

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

Related Posts

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्यात पाणीटंचाई आढावा बैठक; उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

October 2, 2026
6
ताज्या घडामोडी

जोशीवस्ती आठवडे बाजारात मनमानी वसुलीचा आरोप; ग्रामपंचायतीच्या नोटिसांनाही केराची टोपली?

October 2, 2026
3
ताज्या घडामोडी

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा; जमिनी व घरे बळकावणाऱ्यांवर कारवाईची मागणी

October 2, 2026
1
उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक
ताज्या घडामोडी

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणी बैठक

October 2, 2026
3
बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू
ताज्या घडामोडी

बसच्या धडकेत २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

October 2, 2026
48
रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

रस्ते सुरेगाव येथे मोफत छाती एक्स-रे तपासणी शिबिर उत्साहात

October 2, 2026
8
Next Post
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

ताज्या बातम्या

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In