• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in Blog
0
घरफोडी करणाऱ्या चौघांना खांदेश्वर पोलिसांकडून अटक; नऊ गुन्ह्यांची उकल
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

५ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; सुकापूर दुकानफोडीच्या तपासातून आरोपी जेरबंद

कळंबोली प्रतिनिधी(श्रीनाथ लाड): सुकापूर परिसरातील दुकानफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना खांदेश्वर पोलिसांनी घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली असून, त्यांच्या चौकशीत घरफोडीचे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे ५ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RelatedPosts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

१२ सप्टेंबर रोजी सुकापूर येथील मालेवाडी स्टॉप परिसरातील विजय लक्ष्मी इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर या दुकानाचे कुलूप व शटर तोडून चोरट्यांनी मोबाईल फोन व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने व त्यांच्या पथकाने सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नहीद आलम मोहम्मद जलाल (सुकापूर), तजमुल कमरुल खान (सेक्टर १९, वाशी), अश्फाक असदुद्दीन आलम (वाशी) आणि नाझीम मोहम्मद जलाल शेख (सेक्टर १९, वाशी) अशी आहेत.

पोलिसांच्या तपासात आरोपींकडून खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील चार, पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील दोन आणि रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील तीन, असे एकूण नऊ घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबाबत १ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी खांदेश्वर पोलीस ठाण्यात पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत माहिती दिली. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तांत्रिक तपास, पथकाची मेहनत आणि आरोपींची चौकशी यांच्या माध्यमातून एकाच कारवाईत नऊ गुन्ह्यांची उकल झाल्याने खांदेश्वर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

येवल्यात पोलिसांची मोठी कारवाई; ५,०६५ जिलेटिन कांड्या व १,५९५ डिटोनेटर जप्त

Next Post

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

Related Posts

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!
Blog

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
8
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
Blog

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
5
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी
Blog

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026
1
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका
Blog

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

October 2, 2026
1
शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा
Blog

शिलालेखातील इतिहास; विसापूर तलावाची १२५ वर्षांची गौरवगाथा

October 2, 2026
4
चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू
Blog

चांभुर्डी गावात दुष्काळामुळे करपलेल्या पिकांचे पंचनामे सुरू

October 2, 2026
24
Next Post
नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

नवीन पनवेलमधील ‘हेवन थाई स्पा’वर पोलिसांचा छापा; पाच महिलांची सुटका

ताज्या बातम्या

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

करजतच्या आखाड्यात आवासच्या मल्लांचा डंका!

October 2, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिवेआगर समुद्रकिनारी दुर्घटना; आळंदीच्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 2, 2026
रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

रोडपालीतील स्विगी इन्स्टा मार्टमध्ये मुदतबाह्य, खराब खाद्यपदार्थांचा दावा; तक्रारीनंतर अन्न प्रशासनाची तपासणी

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In