• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

पोलीस दल आणि मच्छिमार बांधवांच्या समन्वयातून ‘सुरक्षित समुद्र, सुरक्षित रायगड’चा संदेश

पेण : प्रतिनिधी

RelatedPosts

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दादर सागरी पोलीस ठाणे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सागरी सुरक्षा कबड्डी स्पर्धा २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. या उपक्रमातून रायगड जिल्हा पोलीस दल आणि मच्छिमार बांधव यांच्यातील संवाद, समन्वय व सहकार्य अधिक बळकट करण्याचा संदेश देण्यात आला.

या उद्घाटन सोहळ्यास रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर वालकूल तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि पोलीस अधिकारी जालिंदर वालकूल यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेदरम्यान दादर सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कबड्डीच्या मैदानावर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले. पोलीस कर्मचारी आणि मच्छिमार बांधवांमध्ये खेळाच्या माध्यमातून आपुलकीचे व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाले.

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मच्छिमार बांधव, सागररक्षक दल आणि रायगड जिल्हा पोलीस यांच्यातील समन्वय महत्त्वाचा आहे. समुद्रात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी परस्पर संवाद आणि सहकार्य वाढविणे, तसेच सागरी सुरक्षेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

‘एकजूट, सतर्कता आणि समन्वय’ या त्रिसूत्रीवर आधारित या कबड्डी स्पर्धेत पोलीस दल व मच्छिमार बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. खेळाच्या माध्यमातून सागरी सुरक्षेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

यावेळी ‘सुरक्षित समुद्र, सुरक्षित रायगड’ हा संदेश देण्यात आला. सागरी सुरक्षेसाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छिमार समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.

दादर सागरी पोलीस ठाण्याच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिक व मच्छिमार बांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, सागरी सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव तत्पर असल्याचा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Tags: Pradip Satane
Previous Post

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सहा भाविकांचा मृत्यू

Next Post

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार

Related Posts

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
1
ताज्या घडामोडी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
0
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था
ताज्या घडामोडी

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026
0
एसटीचे ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन
ताज्या घडामोडी

एसटीचे ४ व ७ दिवसांचे प्रवास पास आता घरबसल्या ऑनलाइन

October 2, 2026
0
अंदाजपत्रक, निविदा, एम.बी. आणि प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप
ताज्या घडामोडी

अंदाजपत्रक, निविदा, एम.बी. आणि प्रत्यक्ष कामात तफावत असल्याचा आरोप

October 2, 2026
2
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार
ताज्या घडामोडी

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार

October 2, 2026
1
Next Post
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत कुणकेश्वरच्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा सत्कार

ताज्या बातम्या

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

वांजुळपोईतील अमळनेर बंधारा रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था

October 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In