• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पंचनामे व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दौरा; येवता, मानकी व पारस येथे भेटी

अकोला | प्रतिनिधी : राज्याचे महसूल मंत्री तथा कोरडा दुष्काळ राज्य उपसमितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडीअडचणी, पीक पंचनामे आणि विविध मागण्यांबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. भाजप नेते तथा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी ही माहिती दिली.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

दौऱ्यादरम्यान सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत अकोला शहर व आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अकोला तालुक्यातील येवता येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

यानंतर बाळापूर तालुक्यातील मानकी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. तसेच पारस येथे शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. पंचनामे, नुकसानभरपाई आणि दुष्काळाशी संबंधित विविध प्रश्नांबाबत शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारली जाणार आहेत.

या दौऱ्यात पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महापौर सौ. शारदाताई खेडकर, जयंत मसने, संतोष शिवरकर, विजय अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Tags: Dyneshwar Thakre
Previous Post

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
1
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
1
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
5
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
16
ताज्या घडामोडी

रांजणी सजेतील शेतकऱ्यांची महसूल कामांसाठी फरफट

October 2, 2026
3
Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In