• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

कथा-कथन, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व ‘महात्मा गांधी साहित्य भूषण’ पुरस्कार सोहळ्याने रंगला साहित्यिक मेळावा

कोल्हापूर प्रतिनिधी :

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

कोल्हापूर येथील भारत मंदिर सभागृहात के.एस.आय. पब्लिकेशनच्या वतीने ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या संमेलनात कथा-कथन, कवी संमेलन, पुस्तक व स्मरणिका प्रकाशन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘महात्मा गांधी साहित्य भूषण’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आल्यानंतर कवी इंगळी सरकार विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनायक कुलकर्णी यांच्या हस्ते विविध पुस्तके, प्रातिनिधिक काव्यसंग्रह व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

कथा-कथन सत्रात बाळासाहेब देशमुख यांनी ‘मंतरलेला वाडा’ ही कथा सादर केली. प्रमुख पाहुणे विनायक कुलकर्णी यांनी साहित्यिकांच्या लेखनातील सर्जनशीलतेचे महत्त्व सांगितले. संमेलनाध्यक्ष दत्तात्रय वारकड यांनी साहित्यिकांनी समाजाला दिशा देण्यासोबतच युवकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले. सिने निर्माते-दिग्दर्शक काशिनाथ आहेर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यानंतर झालेल्या कवी संमेलनात शेतकरी, दुष्काळ, नातेसंबंध, प्रेम, विनोद आणि सामाजिक विषयांवरील विविध आशयांच्या कविता सादर करण्यात आल्या. भारत कवितके यांनी ‘मला काय माहीत?’ ही वास्तववादी व विनोदी ढंगाची कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. कवी संमेलनाच्या अध्यक्षा मेघा ऊळागड्डे होत्या. मनिषा कांबळे, भाऊसाहेब कांबळे, सुरेखा वाडकर, मनिषा वराळे, माधुरी पंडित, ज्ञानेश्वर धायरीकर, कामत सर यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘महात्मा गांधी साहित्य भूषण’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुंबई प्रतिनिधी, पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांना त्यांच्या ‘आयुष्य उसवताना’ या आत्मचरित्रासाठी ‘महात्मा गांधी साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संमेलनाला साहित्यप्रेमी, कवी, लेखक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Tags: Bharat kavitake
Previous Post

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

Next Post

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
37
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
22
Next Post
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In