तहसील कार्यालयावर धडक; शेतकरी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
देवणी (प्रतिनिधी) : दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवणी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थी न्याय मोर्चा काढण्यात आला. लातूर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकरी व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चात तालुकाध्यक्ष तथा लातूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ॲड. अजित भाऊ बेळकुने, जिल्हा परिषद सदस्य औदुंबर भैय्या पांचाळ, नगराध्यक्ष कीर्ती ताई घोरपडे, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातंबरे, लातूर जिल्हा कोषाध्यक्ष वैजनाथ लुल्ले, जिल्हा सचिव रामभाऊ भंडारे, जिल्हा सचिव अनिल पाटील, संजय बिरादार उजेडकर, सेवादल विधानसभा अध्यक्ष बालाजी वळसांगवीकर, शहराध्यक्ष जावेद तांबोळी, युवक तालुकाध्यक्ष शरण लुल्ले, सोशल मीडिया अध्यक्ष माधव बेंजरगे आदी उपस्थित होते.
यावेळी अरुण पाटील वलांडीकर, वैभव कारभारी, प्रणव बिरादार, गणेश फावडे, रेवण बडूरे, धनराज टेकाळे, धनराज मठपती, कृष्णा इंगोले, अमित घुगे, राहुल श्रीवास्तव, परमेश्वर भंडे, शिवा कांबळे तसेच नगरसेवक नदीम मिर्झा, नगरसेवक योगेश ढगे, नगरसेवक अमरदीप बोरे, नगरसेवक आश्विन लांडगे, सुभाष पाटील, देविदास पतंगे, विलास वाघमारे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने मांडण्यात आली.









