• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 8, 2026
in Blog
0
डोणगावमध्ये कोट्यवधींचा खर्च होऊनही पाणीटंचाई; चौकशीसाठी मेहकर पंचायत समितीसमोर ९ दिवसांपासून साखळी उपोषण.
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

​जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची उपोषणकर्त्यांना भेट; ८ आक्टोबर कंत्राटदारांची बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन ​डोणगाव. डोणगाव येथील नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपयांच्या मंजूर निधीपैकी ३ कोटी २५ लाख ५० हजार रुपये खर्च झाले असून ९५ टक्के भौतिक प्रगति झाल्याचा दावा कागदोपत्री केला जात आहे. मात्र, एवढा मोठा निधी खर्च होऊनही डोणगाववासीय आजही पाण्यापासून वंचित आहेत. या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत, योजनेची सखोल चौकशी व दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या ९ दिवसांपासून मेहकर पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट)प्रशांत पाटील हे साखळी उपोषण करीत आहेत.

RelatedPosts

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

​मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग मेहकर अंतर्गत डोणगावच्या पाणीपुरवठा योजनेची मूळ अंदाजपत्रकीय किंमत ४७३.५९ लाख रुपये आहे. कागदपत्रांनुसार काम ९५% पूर्ण दाखवून ३२५.५० लाख रुपये खर्च झाल्याचे स्पष्ट होते. तरीही प्रत्यक्ष गावात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ​मु.

का. अ. गुलाबराव खरात यांची मध्यस्ती उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेत ७ आक्टोबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गुलाबराव खरात यांनी मेहकर येथील उपोषणस्थळाला प्रत्यक्ष भेट दिली आणि प्रशांत पाटील सह आंदोलकांशी चर्चा केली. योजनेतील अनियमितता व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, त्यांनी ८ आक्टोबर रोजी संबंधित कंत्राटदारांची तातडीची बैठक बोलावून योग्य ती कडक कारवाई करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.

​प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आता कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते आणि डोणगाववासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या कधी सुटते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.प्रशांत कृष्णराव पाठक यांना घोषित

Next Post

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

Related Posts

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात
Blog

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

October 8, 2026
0
धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी
Blog

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

October 8, 2026
0
Blog

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

October 8, 2026
0
ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू
Blog

ट्रक-मोटारसायकलची आमने-सामने धडक;२२ वर्षीय युवकाचा मृत्यू

October 8, 2026
10
देऊळगाव राजा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी
Blog

देऊळगाव राजा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

October 8, 2026
7
भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.
Blog

भगतसिंग जयंतीनिमित्त कुरणखेड येथे रक्तदान शिबीर आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थित सामाजिक उपक्रमअकोला …तालुका प्रतिनिधि शुभम गावंडे.

October 8, 2026
3
Next Post
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत दसऱ्यापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची मागणी

ताज्या बातम्या

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

सामान्य नागरिकांपर्यत शासकिय योजनाव सेवा थेट पोहोचचिण्यासाठी सांगलीजिल्हात

October 8, 2026
धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

धानवड-पिंपळे चिंचोली शिवारातील धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी

October 8, 2026

खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक?

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In