पाण्याची उपलब्धता
कोळपेवाडी प्रतिनिधी एल निनो च्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामात पाणीटंचाई भासू लागली आहे
त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनाचा विचार न करता पाण्याची परिस्थितीचा विचार घेऊन रब्बी हंगामाचे नियोजन करावे तसेच रब्बी पिक निवडताना पाण्याची उपलब्धता व सिंचन पद्धती तपासूनच निर्णय घ्यावा असे आव्हान मनोज सोनवणे यांनी शेतकऱ्यांना केले
चालू वर्षी एल निनो च्या प्रभावामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला आहे.
तेव्हा रब्बी लागवड करताना पाण्याची उपलब्धता व जमिनीची प्रत पाहूनच पीक नियोजन करावे पाणी कमी असल्यावर कमी पाण्याचे कमी वेळात येणारे पीक निवडावे
जमिनीचा ओलावा टिकवण्यासाठी बांधबंधिस्त सेंद्रिय खत आणि आच्छादनाचा वापर करावा तसेच शेत तळे असल्यास शेततळ्यातील पाणी नियोजन पद्धती तसेच सिंचन पद्धतीने कसे वापरता येईल याचे नियोजन करावे
पाणी टंचाईच्या काळात चारा पिकांना प्राधान्य द्यावे हिरवा चारा तसेच वाळलेला धारा याची साठवण करून चाऱ्याचे नियोजन करावे पाणी बचतीसाठी शक्य तेथे ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करून जेवढे पाणी वाचवता येईल तेवढा प्रयत्न करावा असे आव्हान तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी शेतकऱ्यांना केले.







