पातूर तालुका प्रतिनिधी गोपाल चंदनसे
दुष्काळाच्या परिस्थितीत तरी गावाला पाणी मिळेल का असा गावकऱ्या समोर प्रश्न
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी असलेली हर घर नळ योजना प्रत्येक गावात 40%/50% काम होऊन बंद पडलेल्या आहेत ,
al nino च्या प्रभावामुळे या वर्षी दुष्काळाची झळ प्रत्येक गावाला सोसावी लागत आहे, सप्टेंबर मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अजून नऊ महिने पाण्याची झळ लागणार आहे, त्यात गावात चालू असलेल्या जुन्या पाइप लाईन हर घर नळ योजने मुळे तोडल्या आहेत , त्यामुळे गावात मिळणारे पाणी सुद्धा बंद झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यानि कित्येक वेळा हर घर नळ योजनेचा पाठ पुरावा केला आहे पण त्यातून काही त्यांना यश आले नाही
गावातून आता लवकर नळ योजनेचे काम पूर्ण करून त्यामधून पाणी मिळावे अशी मागणी जोर धरत आहे.







