खेड : युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष माननीय श्री. अंकुश आगरकर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने साजरा करण्यात आला. द्वारका वृद्धाश्रम तसेच द्वारका गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. पवार साहेब यांच्या संस्थेत हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
अंकुश आगरकर हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून आपला वाढदिवस कोणताही मोठा खर्च किंवा दिखावा न करता वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच अनाथ मुलांच्या सहवासात साजरा करत आहेत. वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व मुलांसोबत वेळ घालवत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
या प्रसंगी युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संघटक सुरेश अप्पा गायकवाड, लहू शेठ भाकरे, अशोक पाचुंदकर, विलास रोहिले, संदीप भाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत समाजातील गरजू घटकांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्याची परंपरा अंकुश आगरकर यांनी कायम ठेवली आहे.









