युवा शेतकरी वळले फूल शेतीकडे….
@)> युवाशेतकरी नामदेव काळे.
मानवत /प्रतिनिधी
मानवत तालूक्यातील मौजे सावळी येथील युवा शेतकरी तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालूका अध्यक्ष मा. नामदेव काळे यांनी आपल्या शेतात पारंपारीक पिक पध्दती ऐवजी अंतर पिक घेत असून यंदा त्यानी आपल्या शेतात फूल शेती व हळद शेती सुरू केली असल्याने त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतातील शेत जमीने मध्ये पाच ते सात गुंठे रानात गट नंबर ७४- ब मध्ये दोन हजार झेंडूची भगव्या व पिवळ्या रंगाची फुले लावली आहेत. त्यांनी या जातिवंत फुलांचे रोप हे खरात आडगाव ता माजलगाव येथील शिवकृपा रोप वाटीका येथुन आणले लावगडीसाठी आणले होते.
मागच्या वर्षी सुद्धा काळे यांच्याकडे ऊन्हाळी एक हजार झेंडू व एक हजार गलांडा फुलांची झाडे होती. मागच्या वर्षी उन्हाळ्यात काळे यांना ५-७ गुन्ठ्या मध्ये चाळीस – पंचेचाळीस हजाराची फुले होती.
म्हणून या वर्षी सुद्धा दसरा दिवाळीचा मुहूर्त ( टाइमटेबल ) बघुन फूलशेतीच्या झेंडू फुलांची लागवड केली होती. त्यामूळे शेतात सर्वत्र पिवळे फूले डोलू लागली तर
आज शेतात रोजी फुले निघायला तयार झाली असून ती फूले अतिशय चांगली असल्यामुळे तोडण्या योग्य झाली आहेत. चांगली ताजी व टवटवीत फूले ग्राहकांना आर्कषित करीत असल्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेता मानवत व्यापार पेठेत सध्या दररोज रास्त भावात नागरिकांना विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फुलारी किंवा व्यापारी यांना न देता स्वतः नागरिकांना सहज व रास्त भावात हातावर विक्री करण्यात येत असल्यामुळे सणासुदीच्या दिवसात रास्तभावात मोठ्या प्रमाणात ताजी व रंगीत फूले मिळत असल्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त केल्या जात असून यूवा शेतकरी नामदेव काळे यांच्या फूलशेती उपक्रमशील प्रयोगाचा मानवत तालूक्यातील पंचकोशितून कौतूक केल्या जात आहे. तर फूल शेतीमूळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत असल्याने प्रयोगशील यूवा शेतकरी नामदेव काळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.











