• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दगडाच्या खाणीतून उमललेलं स्वप्न रुपी फुल :‘छबिला’

Pratik Tidke by Pratik Tidke
October 11, 2026
in Blog
0
दगडाच्या खाणीतून उमललेलं स्वप्न रुपी फुल :‘छबिला’
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

पु. ल. देशपांडे लघुनाट्यगृहात मी प्रवेश करतो.
थिएटर पूर्ण भरलेलं आहे. प्रेक्षक आपापल्या जागेवर स्थिरावतात,दिवे बंद होतात आणि सभागृहात अंधार पसरतो.

RelatedPosts

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता

चित्रपट सुरू होण्यापूर्वीची कॅन्सरची क्लिप संपते. पडद्यावर सेन्सॉर प्रमाणपत्र दिसतं. त्यानंतर प्रोडक्शनचा लोगो…

आणि अचानक त्या अंधारातून दगड फोडण्याचा आवाज ऐकू येतो.

हळूहळू पडद्यावर एक wide angle frame उलगडते

रखरखीत जमीन. कुठेही हिरवळ नाही. दूरवर पसरलेली दगडाची खाण. ट्रॅक्टरचा आवाज. मजूर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत दगड भरत आहेत. दगड एकमेकांवर आदळण्याचा आवाज…

जवळपास तीन मिनिटं पडद्यावर फारसं काही घडत नाही. पण खरं तर त्या तीन मिनिटांत ‘छबिला’ आपल्याशी खूप काही बोलून जातो.

ही केवळ चित्रपटाची सुरुवात नसते; ही त्या जगाची ओळख असते, जिथे माणसाचं आयुष्य दगडासारखं कठीण आहे.

आणि मग सुरू होतो ‘छबिला’चा पावणेदोन तासांचा प्रवास.

मनमाडजवळच्या अनकवाडे गावातील अनिल, अजय आणि अरुण अमृत भालेराव या तीन भावांनी जवळपास २५ वर्षांच्या संघर्षानंतर हा चित्रपट उभा केला. वास्तववादी आणि संवेदनशील विषय असल्यामुळे सुरुवातीला व्यावसायिक निर्माता मिळत नव्हता. अखेर स्वतः कर्ज काढून त्यांनी आपल्या स्वप्नाला आकार दिला.

काही कथा अशा असतात की त्यांना पडद्यावर आणण्यासाठी केवळ पैसा पुरत नाही; त्यासाठी जिद्द, संयम आणि त्या कथेवरचा अढळ विश्वास लागतो आणि समाजाला काहीतरी देण्याची इच्छा…

‘छबिला’ ही त्याच विश्वासातून आणि इच्छेतून जन्मलेली कथा आहे.

दिग्दर्शक अनिल भालेराव आपल्याला एका दुर्गम भागातील भटक्या लभाण समुदायाच्या जगात घेऊन जातात. दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. त्या कुटुंबातील छोट्या गण्याच्या शिक्षणाभोवती कथानक आकार घेतं.

शिक्षण आपल्यासाठी कदाचित सहज उपलब्ध असलेली गोष्ट असेल. पण गण्याच्या जगात ते भविष्य बदलण्याची शक्यता आहे.

आणि ती शक्यता जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करते त्याची आई ..जना.

स्वाती गोतावळे यांनी साकारलेली जना मनात घर करते. मुलासाठी काहीतरी वेगळं आयुष्य असावं, अशी तिची साधी इच्छा आहे. तिच्या व्यक्तिरेखेत मोठमोठे संवाद नाहीत; पण तिच्या जगण्यातून तिचा संघर्ष सतत जाणवत राहतो.

एका बाजूला पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेलं जगणं आणि दुसऱ्या बाजूला मुलासाठी उघडावं असं नवं जग..या दोन टोकांमध्ये ‘जना’ उभी आहे.

याच भावविश्वात विनय ढाकडे यांचा किसन (बाप) यांनी कमाल साकारला आहे. त्यांच्या चेहऱ्याचे expressions आणि बोलक्या डोळ्यातून अभिनय झळकत होता.दारुड्याच्या अभिनयासाठी फुल्ल मार्क्स.अरुण अमृत भालेराव यांचा अन्या किसी हिरो से कम नहीं..
तसेच
काजल परदेशी, दिलीप डोंबे, राजकिरण कुणकिकर, महेश घुंगरे, राजश्री पाटील, भाग्यश्री पाटील, देवा पांडे, ईश्वर मोरे, सचिन पाटिल, राजन झांबरे, छगन जोहरे आणि इतर कलाकारांच्या व्यक्तिरेखा कथेला आकार देतात.

या अभिनयाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात जाणवणारा सहजपणा. अनेक प्रसंगांत कलाकार अभिनय करत आहेत असं न वाटता, आपण त्यांच्या आयुष्याचा एखादा तुकडा पाहतोय असंच वाटतं. अजय भालेराव यांचे सिनेमाफोटोग्राफी वर्क उत्कृष्ट झाले आहे. यात वेशभूषाकार आणि कला दिग्दर्शक अविनाश माळी यांनी उत्तम काम केले आहे.
साउंड रेकॉर्डिस्ट सतीश दडस आणि साउंड मिक्सिंग तेजस सुपनेकर चित्रपटाला वेगळी झालर निर्माण करतात. रहिदास नागभिडे यांचं संगीत कथानकाशी पूरक असून त्यातून ते कथेची भावना मनापर्यंत पोहचवतात.
चांदवड, नांदगाव, मनमाड या भागांतील लोकेशन्स कथेला गडद करतात.

‘छबिला’ची खरी ताकद कदाचित त्याच्या मांडणीत आहे.
चित्रपट आपल्याला दया मागत नाही. तो आपल्या व्यक्तिरेखांना केवळ परिस्थितीचे बळी म्हणून दाखवत नाही. त्यांच्या इच्छा आहेत, स्वप्नं आहेत, नाती आहेत आणि जगण्याची स्वतःची एक पद्धत आहे.

म्हणूनच दगडाची खाण ही केवळ चित्रपटाची पार्श्वभूमी राहत नाही; ती त्या माणसांच्या आयुष्याचा एक भाग बनते.

आणि त्या पार्श्वभूमीवर गण्याच्या शिक्षणाचं स्वप्न अधिक मोठं वाटू लागतं.

दगड फोडणाऱ्या हातांनी मुलाचं भविष्य घडवण्याचा प्रयत्न …ही या चित्रपटाची सर्वात हळवी प्रतिमा आहे.

‘छबिला’ पाहताना सतत एक गोष्ट जाणवत राहिली ….आपण पडद्यावर दोन तासांची कथा पाहत असलो, तरी या चित्रपटामागे २५ वर्षांचा संघर्ष उभा आहे.

अनिल, अजय आणि अरुण भालेराव यांनी ज्या चिकाटीने हा चित्रपट पूर्णत्वाला नेला, त्याला नंतर मिळालेला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांचा सन्मान त्यामुळे अधिक अर्थपूर्ण वाटतो.

६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘छबिला’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम क्रमांक मिळाला आणि एकूण पाच पुरस्कारांनी चित्रपटाचा गौरव झाला. छबिला ची दखल घेतल्याबद्दल आभार… ज्युरी टीम चे मनभर कौतुक…

तसे तर पुरस्कार हा चित्रपटाच्या प्रवासाचा शेवट नसतो; पण दीर्घकाळ जपलेल्या स्वप्नाला मिळालेली सार्वजनिक दाद नक्कीच असते.

आजचा अनुभव मात्र माझ्यासाठी आणखी खास होता.

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे पु. ल. देशपांडे कलादालनात आयोजित विशेष स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट त्याच्या संपूर्ण टीमसोबत पाहता आला.

चित्रपट संपल्यानंतर झालेल्या परिसंवादात कलाकार आणि टीमशी संवाद साधण्याची संधी मिळाली. पडद्यावर ज्या व्यक्तिरेखा आपण पाहिल्या, त्या व्यक्तिरेखांमागची माणसं समोर बसलेली पाहणं हा स्वतःमध्येच एक सुंदर अनुभव होता.

चित्रपट पाहण्यापेक्षा त्यामागचा प्रवास समजून घेतला, की सिनेमा आणखी जवळचा वाटतो.

थिएटरमधून बाहेर पडताना मात्र मनात पुन्हा सुरुवातीचाच तो आवाज घुमत होता….

दगड फोडण्याचा आवाज….धूर…

पहिल्या तीन मिनिटांत पडद्यावर दिसलेली ती खाण आता केवळ एक दृश्य राहिलेली नव्हती. तिच्यातली माणसं, त्यांचं जगणं, गण्याचं स्वप्न त्या दगडांमधून उमलून येतंय आणि जनाची धडपड मनात घेऊन मी बाहेर पडत होतो.

कदाचित चांगल्या सिनेमाची हीच खूण असावी.

पडदा खाली येतो, कथा संपते… पण तिचा आवाज मनात बराच काळ सुरू राहतो.

‘छबिला’ माझ्यासाठी असाच एक अनुभव ठरला.

दगडांच्या त्या रखरखीत जगातून उमललेलं एक छोटंसं स्वप्नरुपी फुल…जे फुल देवाला वाहिलं जात नाही…ज्याला फारसे महत्त्व नाही…ते दगडफुल
‘ छबिला ‘

सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन…
You all are Heroes

कुणाल साळुंके,
चित्रपट विश्लेषक/ समीक्षक

Ad 1
Previous Post

तामसा येथे अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा!

Next Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.११ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

Related Posts

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
0
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित
Blog

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026
2
अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता
Blog

अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता

October 11, 2026
4
नवरात्री विशेष : स्त्रियांसाठी नऊ दिवस, नऊ कायदे
Blog

नवरात्री विशेष : स्त्रियांसाठी नऊ दिवस, नऊ कायदे

October 11, 2026
5
मुरबाड प्रतिनिधी विक्रम कोर असोळे गावातील कोर परिवाराच्या कुलस्वामिनी मंदिरात घटस्थापना उत्साहात संपन्न!
Blog

मुरबाड प्रतिनिधी विक्रम कोर असोळे गावातील कोर परिवाराच्या कुलस्वामिनी मंदिरात घटस्थापना उत्साहात संपन्न!

October 11, 2026
4
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठी घडामोड! मुख्य आरोपीसह दोघे अटकेत; काय घडलंय नेमकं?
Blog

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात सर्वात मोठी घडामोड! मुख्य आरोपीसह दोघे अटकेत; काय घडलंय नेमकं?

October 11, 2026
4
Next Post
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.११ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.११ ऑक्टोबर २०२६ ला असलेल्या ५८ व्या पुण्यतिथी निमित्त साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

ताज्या बातम्या

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

भारतीय बौद्ध महासभा शाखा दोडामार्गच्या वतीने वर्षावास कार्यक्रम संपन्न; दिपक जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा, नूतन कार्यकारणी घोषित

October 11, 2026
अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता

अहिल्यानगर जिल्ह्यात २२ साखर कारखाने गाळपासाठी सज्ज; यंदाचा हंगाम दोन ते तीन महिनेच चालण्याची शक्यता

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In