मिरज शहरामधील मध्यवर्ती असलेल्या ब्राह्मणपुरी मधील श्री अंबाबाई मंदिरामध्ये सध्या नऊ दिवस शारदीय नवरात्र उत्सवाची लगबग सुरु आहे रोज या देवस्थानाला हजारो भाविक दर्शनाला येत असतात तसेच या नवरात्र उत्सवादरम्यान शारदीय नवरात्र संगीत महोत्सवालाही संगीत प्रेमींची लक्षणीय उपस्थिती असते. त्यामुळे नवरात्र उत्सवात ब्राह्मणपुरी परिसर फुलून जातो येणाऱ्या भाविकांना मिरज मधील श्री संभा तालीम चौक परिसरामध्ये वास्तव्यास असलेले चव्हाण कुटुंबीय गेली पाच वर्ष मोफत ‘प्रसादम’ चे वाटप करत आहेत. हिम्मतबद्द्दर सोनीकर घराण्यातील कै बाबासाहेब गुणवंतराव चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली पाच वर्ष सातत्याने हा ‘प्रसादम’ देण्यात येतोय कै बाबासाहेबांचे चिरंजीव उद्योजक प्रशांत चव्हाण आणि नातू चि हिमांशू प्रशांत चव्हाण हे नवरात्रातील नऊ दिवस हजारो भाविकांना मोफत प्रसाद आणि पाणी वाटप करत आहेत आमच्या प्रतिनिधींनी प्रशांत चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले कि आमच्या हिम्मतबहाद्दर घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे शॉर्य आणि दानशूरता हि आमच्या घराण्याची परंपरा आहे त्याप्रमाणे आमच्या वडलांची दानत हि मोठी होती घरामध्ये आलेल्या मनुष्याला रिकाम्या हाताने ते कधीही परत पाठवत नसायचे किमान पोटभर जेवण त्या व्यक्तीला मिळायचे त्याप्रमाणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हीही गेली पाच वर्ष नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून संभा तालीम परिसरातील आमचे सहकारी मित्रांसोबत हे अन्नदानाचे पवित्र असे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद आहे दररोज हजारो नागरिक आमच्या प्रसादम चा लाभ घेत आहेत.
Discussion about this post