मुखेड – ही वेळ बदलाची,
ही वेळ मुखेड-कंधारच्या परिवर्तनाची

आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मातोश्री मंगल कार्यालय, नरसी रोड, मुखेड येथे शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीदिनानिमित्त मुखेड शहर व ग्रामीण भागातील नाभिक बांधवांच्या वतीने नाभिक समाजाचा महापरिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि दीपप्रज्वलन केले. नाभिक समाजाच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी श्री. सुरेश कोतवाले यांनी केली.
“जे मागे आहे त्यांना पुढे आणण्याचे काम आम्ही करत आहोत. वडिलोपार्जित कामाला गिफ्ट मानलं पाहिजे, कोणतच काम कमी नाही. आपल्या सर्वांचे व्यक्तिमत्व उभारण्याचं काम नाभिक समाज करत आहे.
कामाला देव मानून आधुनिक पद्धतीने काम केले तर तुम्ही करोडपती होऊ शकता. त्यामुळे गाफील राहू नका. कोण काहीही करू शकतो, ही लोकशाहीची गरिमा आहे. ५ जानेवारी २०२४ ला राज्य सरकारने श्री. संत सेनाजी महाराज केसशिंपी महामंडळ स्थापन केले.
यातून नाभिक समाजासाठी योजना आणली. या योजनेतून एक लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात मिळतात. अडीअडचणी, दुःखात एकमेकांना मदत करावी. आपल्या पायावर उभे राह
Discussion about this post