डॉ.अरविंद भातांब्रे यांनी केली निलंगा विधानसभा उमेदवारीची मागणी..
शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी / वाल्मीक सूर्यवंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी घालून दिलेल्या नियमानुसार आज निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.अरविंद भातांब्रे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा निवडणुकीची उमेदवारीची मागणी काँग्रेस पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अँड.किरण जाधव यांच्याकडे केली डॉ.अरविंद भातांब्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून निलंगा विधानसभा मतदारसंघात सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करत असून, डॉ.अरविंद भातांब्रे यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबीर, पक्षाचे मेळावे व अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील आपली ओळख निर्माण केली असून डॉ.अरविंद भातांब्रे यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत धोंडे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करून मतदारसंघातील दहा हजार कार्यकर्ते यांना एकत्र आणून ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला होता तसेच डॉ.अरविंद भातांब्रे यांचे महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुद्धा अनेक वेळा एकत्र घेऊन अनेक सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमाचे आयोजन केले असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वच्छ प्रतिमा, सुशिक्षित, तसेच सर्वाच्या अडीअडचणीला धावून जाणारा चेहरा म्हणून आज निलंगा विधानसभा मतदारसंघात डॉ.अरविंद भातांब्रे यांची ओळख निर्माण झाली असून त्यांना काँग्रेस पक्षाचे निलंगा विधानसभा मतदारसंघातील तिकीट मिळावे अशी मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्ते यांची इच्छा असून त्यानूसार आज डॉ.अरविंद भातांब्रे यांनी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केली आहे. वेळी प्रशिक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष चक्रधर नाना शेळके, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रविण सुर्यवंशी, माजी पंचायत समिती सदस्य महेश देशमुख, आंबेगावचे सरपंच प्रमोद मरूरे, अनिल पाटील, प्रविण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post