लातूर जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेकडून सदाभाऊ खोत यांचा सत्कार..
प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ. लातूर जिल्हा रयत क्रांती संघटनेच्या वतीने विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्या निवडीबद्दल शिरूर अनंतपाळ, निलंगा,देवणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांच्या इस्लामपूर ता (वाळवा )गावी प्रत्यक्ष भेट घेऊन यथोचित सत्कार, सन्मान केला.सध्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने यावेळी निलंगा विधानसभा मतदारसंघातून लातूर जिल्हा रयत क्रांती संघटना,निलंगा विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असून, याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्याकडे रयत क्रांती संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी पेठे यांच्या नेतृत्वाखाली निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अधिकॄत तिकीटाची मागणी केली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितले की तुम्ही आगोदर गावा गावातील लोकांना भेटा त्यांच्या आडचणी समजून घ्या लोकांशी चर्चा करा मतदारांनी तुम्हाला निवडणुक लढविण्यासाठी होकार दिला तर मी पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.निवडणूक लढविण्यासाठी कामाला लागा आसे आदेश दिल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले.यावेळी रयत क्रांती संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवाजी पेठे, ओबीसी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.प्रभाकर चोचंडे, निलंगा पंचायत समिती माजी सदस्य राजकुमार सोमवंशी, शिरूर अनंतपाळ तालुका संरपच संघटना अध्यक्ष खंडेराव चव्हाण, संरपच ज्ञानोबा मोगले,बिबीशन भोसले, विनोद कुंभार, तुकाराम काळे, प्रवीण जाधव, श्रीकांत कांबळे,राम नलवाडे, माजी चेअरमन उमाकांत बोळेगावे,भागवत ऐकुरगे,दिलीप भदरगे, विवेक वाडीकर, हरिणंदन मोगरे, अरविंद गोरपटले आदी पन्नास कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post