
तर्डोबावाडी येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचे हे पोरगं थोडे शिकले भागलं आणि राजकारणाचे गोडी त्याला लागली. पाहता पाहता त्यांनी आमदारकीला तिकीट नाही मिळालं म्हणून अपक्ष उभे राहिले आणि पराभव पत्करावा लागला, परवाने खचून न जाता , पुन्हा उभा राहीले पुन्हा पराभव पत्करला थोडाही डगमगला नाही. त्यानंतर बाबुराव नावाच्या वादळाने अशी काय जादू आणि असा काय हात कार्यकर्त्यांच्या मागे उभा केला की कार्यकर्ते फक्त बाबुराव जिकडे तिकडे आम्ही असे म्हणू लागले.
आणि तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयाला गवसणी घातली. पुन्हा तीन निवडणुका लढल्या परंतु
सहा विधानसभा निवडणुका लढल्यानंतर केवळ दोन निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवता आला.
आज त्यांची सातवी निवडणूक असती आणि मोठा जल्लोष त्यांच्या गावातही असायचा परंतु 2024 विधानसभा निवडणूक होण्याअगोदर दोन वर्षांपूर्वी त्यांची प्राण दिवस मालवली. आणि आज 2024 ऑक्टोबर शिरूर विधानसभा आणि महाराष्ट्र विधानसभेचे वारे वाहू लागले. सगळीकडे निवडणुकीची तयारी सुरू आहे परंतु शिरूर शहर व पंचक्रोशी मध्ये अनेक कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.
अनेक कार्यकर्त्यांना शिरूर आणि पंचक्रोशी सोडून शिरूर हवेली मतदारसंघातील आज बाबुराव पाचारणे हवे होते असले पाहिजे होती आणि मग दोन महिन्या अगोदर पासून निवडणुकीचा धुरळाच उडाला असता.
परंतु नियतीला ते मान्य नव्हते पण आज 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लागली तरी एकाच बाजूचा धुराळा उडाला आहे दुसऱ्या बाजूचा धुराळा आणि गाडा नंबर एक नसल्याने त्याची उणीव सर्वांनाच भासत आहे.
अनेक कार्यकर्ते यामुळे व्यतीत होताना आम्ही पाहिले आहे.
निवडणुकीनंतर सर्वच कार्यकर्ते माजी विरोधक असो किंवा बरोबर त्यात सर्वांना बरोबर घेऊन जाणार हे वादळ अखेर संपल आणि शिरूर हवेलीची शानच कमी झाली असे म्हणायला हरकत नाही.
कारण विरोधक ही म्हणतात
बाबुराव पाचर्णे म्हणजे एक वेगळे व्यक्तिमत्व होते ज्या व्यक्तिमत्त्वाबरोबर एक वेगळा वर्ग त्याच्या हातात हात घालून राजकारण करत होता. आम्हालाही विरोधक आमदार पाचर्णे वाटायची कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो आम्ही त्यांच्याबरोबर राजकारण केलं परंतु असा नेता आम्ही पाहिला नाही असे विरोधी आमदार ही आज बोलत आहे.
म्हणूनच सर्वांना वाटते निवडणुकही लढली तर बरोबरच्या पैलवान बरोबर लढली पाहिजे आणि तसा पैलवान तसे वादळ आता राहिले नसल्याने भाजपा पक्षाची आणि कार्यकर्त्यांची ही ताकद कमी झाल्याचे आज सर्वांनाच वाटू लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनाच लोकनेते आमदार बाबुराव पाचर्णे यांची आठवण झाली….. कारण हे रसायनच वेगळं होतं…
Discussion about this post