मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : २० नोव्हेंबर रोजी होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कारंजा – मानोरा मतदार संघात महाविकास आघाडी विरुध्द महायुतीचा सामना रंगणार आहे. अद्यापही दोन्ही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाही. त्यामुळे या पक्षांचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत गाव चावडीवर खमंग चर्चेला उधाण आले आहे.यात आता तीसरी आघाडी कडुन प्रहार जनशक्ती पक्षाने कांरजा-मानोरा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला आहे.
कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघ तिसऱ्या आघाडी मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला सोडण्यात आलेला आहे
प्रहार जनशक्ती पक्षाकडून विधानसभा उमेदवार २०२४ चा सार्वत्रिक निवडणुकीत कारंजा मधून राहणार वाशिम जिल्ह्यात आपले वेगळे वलय निर्माण केलेले मानोरा नगर पंचायत चे नगरअध्यक्ष प्रहारचे जिल्हाअध्यक्ष हेमेन्द्रभाऊ ठाकरे यांनी आपला निर्णय पक्षाकडुन आदेश येईपर्यंत राखून ठेवला आहे
तसेच वाशिम जिल्हा परीषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे यांनी पण आपला निर्णय राखून ठेवला आहे.
२००३ मध्ये काकू अनिताताई अनिलदादा ठाकरे अपक्ष कुपटा सर्कल मधून जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या आणि महीला व बालकल्याण सभापती झाल्या,
२००४ मध्ये मंगरूळपीर विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून चवथ्या क्रमांकाचे मते मिळविली होती ,
२०१३ गव्हा जिल्हा परिषद सर्कल मधून अपक्ष निवडनुक लढवून प्रचंड मताने विजय मिळवून जिल्हा परिषद मध्ये कृषी व पशु संवर्धन सभापती म्हणून कृषी सभापती पदाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी गावोगावी जनता दरबार घेण्याची सुरवात केली ,
व नागरिकांच्या समस्या सोडविल्या.
२०१५ मध्ये त्यांच्या पत्नी मानोरा नगर पंचायत मधून विजयी होऊन पहिल्या महिला नगर अध्यक्ष झाल्या व २०२२ मध्ये पुन्हा मानोरा नगर पंचायत मध्ये पती पत्नी दोघेही विजयी झाले व पहिले पुरुष नगर अध्यक्ष म्हणून निवड झाली ,
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष व पहिला पुरुष अध्यक्ष म्हणून नगर पंचायतीचे अध्यक्ष पद भूषविले,
मानोरा नगर पंचायतसन २०१५ पासून नव्याने निर्माण झाली तेव्हा पासून आज पर्यंत जनमानसाच्या सहकार्याने एक हाती सत्ता ठेवली आहे.
सध्या मा.ना. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशीम जिल्हाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहे तिसऱ्या आघाडीकडून कारंजा विधानसभा मतदार संघ प्रहार यांच्या करिता घेतला आहे,
बच्चू भाऊ यांचा आदेश आल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल असे ठरले आहे,
चद्रकांतदादा ठाकरे हे माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत २००८ पासून ते जिल्हा परीषदचे अपराजीत नेतृत्व करीत आहे .ते २००८ मध्ये कृषी संर्वधन सभापती २००८ते २०१३ शिक्षण सभापती २०१३ते २०१९ उपअध्यक्ष व अर्थ बांधकाम सभापती २०१९ते २०२४ अविरोध वाशिम जिल्हा परीषद अध्यक्षपदी विराजमान आहे तसेच कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती पण आहेत मंगरुळपीर व मानोरा तालूक्यात पंचायत समीती .खरेदी विक्री संघ .कृषी उत्पन्न बाजार समीतीवर त्यांचे संचालक .अध्यक्ष जिल्हा परीषद सदस्य आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस आहे. तरी पण महा विकास आघाडी व महायुतीने आपले पक्षाचे उमेदवार जाहीर केलेले नाही. उमेदवारी ठरविणे बाबत एकमत न झाल्याने कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत इकडे तिकडे फिरत आहेत. उमेदवार कधी जाहीर करणार? कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार अश्या अनेक विविध चर्चेला मतदार संघात उधाण आले आहे.
बॉक्स …..
मा.बच्चुभाऊ कडु यांनी कांरजा-मानोरा मतदारसंघ तिसऱ्या आघाडीकडून प्रहार पक्षासाठी सोडवून घेतला आहे माझा उमेदवारी अर्ज आॉनलाईन भरुन आहे २७ तारीख ला बच्चुभाऊने आदेश दिल्यास मी निवडणूक लढविणार आहे.
हेमेंन्द्रभाऊ ठाकरे
जिल्हाअध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष वाशिम
बॉक्स …..
मी अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षाकडुन उमेदवारी माघीतली आहे बघु पक्षाकडुन काय आदेश येतात
नाहीतर २९ तारीख ला कार्यकर्ते यांच्याशी बोलून योग्य ते निर्णय घेवू
चद्रकांतदादा ठाकरे
जिल्हा परीषद अध्यक्ष वाशिम
Discussion about this post