श्रीक्षेञ माहूर – प्रतिनिधी
महाविकास आघाडी व महायुतीत उमेदवारी वरून वावड्या उठल्या जात होत्या परंतु महायुतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम तर महाविकास आघाडी कडून माजी आ.प्रदिप नाईक यांची उमेदवारी जाहीर झाल्याने पुन्हा एकदा आज-माजी आमदार आमने येत पारंपरिक लढाई होण्याचे सध्यातरी संकेत असले तरी दि.२१ रोजी शिवसेना (उबाठा) कार्यकर्ते व पदाधिकारी यांची विधानसभा क्षेञ प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या निवासस्थांनी झालेली बैठकीमुळे अघाडीत बिघाडीचे समिकरण ? तर तिसरी आघाडी हि मतदारसंघात उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे.
विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी महाविकास आघाडी व महायुतीकडे अनेक इच्छुक मातब्बरांनी विधानसभा लढविण्याची तयारी केली होती व तसे त्यांना पक्षाने शब्द हि दिला असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांनी त्या शब्दांवर विश्वास ठेवत मतदारसंघ पिंजुन काढला पण येथे भलतेच झाल्याने, इच्छुक उमेदवारांच्या मनसुब्यांनवर पाणी फिरले गेल्याने इच्छुकात प्रंचड नाराजी पसरल्याचे दिसुन येत आहे. महायुतीकडून विद्यमान आ. भीमराव केराम तर महाविकास आघाडीकडून माजी आ. प्रदिप नाईक यांना उमेदवारी बहाल केल्याने ‘फिर वही दिल लाया ‘अशी चर्चा रंगु लागली असली तरी या पुर्विच वंचित बहूजन आघाडीने प्रा.खुपसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तरी इच्छुक उमेदवारांन पैकी आठरा पगडजातीचे नेतृत्व करणारे शिवसेना उबाठा गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे हे निष्ठावंत म्हणून ओळखले जात असल्याने, त्यांना विधानसभेची उबाठा गटा कडून उमेदवारी मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरल्या गेल्याने मतदारसंघातील सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी अस्वस्थ झाल्याने त्यांची दि .२१ रोजी अंजनखेड येथिल निवासस्थानी विचार विनिमय बैठक संपन्न झाली या बैठकीत कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास अग्रही असल्याचे दिसून आल्याने जर ज्योतीबा खराटे यांनी निवडणुकीचे
रंणशिग फुकल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Discussion about this post