
वार्ताहर प्रशांत माने जुन्नर:- जुन्नर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या उमेदवारीचा तिढा सुटत आला आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर हे मुंबईत शरद पवार गटात प्रवेशासाठी गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी विरोध केला, मात्र, आता हा विरोध मावळू लागल्याची चर्चा आहे. काही तडजोडीअंती सत्यशील शेरकरांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार अतुल बेनके यांना मात्र ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही दिवसांपासून सत्यशील शेरकर यांनी शरद पवार व्यांच्याशी जवळीकता साधली होती. त्यातच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची भुवया उंचावल्या होत्या.सत्यशील शेरकरांना एबी फॉर्मही दिला.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध मावळल्याने सत्यशील शेरकरांच्या पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अद्यापपर्यंत याला पक्षाकडून दुजोरा देण्यात आला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार जुन्नरमध्ये शेरकर हेच उमेदवार राहणार असून त्यांना एबी फॉर्मही दिला आहे. येत्या दोन दिवसात ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शेरकर यांचा सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्याच्या माध्यमातून ते तळागाळापर्यंत पोहोचले आहेच. पण त्यांचे हक्काचे मतदारही आहेत. याशिवाय खा. डॉ. अमोल कोल्हे हे देखील त्यांना मदत करणार आहेत, त्यामुळे विद्यमान आमदार बेनके यांना शेरकरांची उमेदवारी जड जाणार हे निश्चित मानले जात आहे. तदरम्यानच्या काळात पुण्यातील काँग्रेस कार्यालयात एक कार्यक्रमझाला होता, त्यावेळी काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सत्यशील शेरकर यांना सांगली पॅटर्न राबवा किंवा नवा पॅटर्न तयार करू, असे सांगितले होते. त्यामुळे सर्वांच्याचया घडामोडीनंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील होण्यासाठी सत्यशील शेरकर हे मुंबईला गेलो होते. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासह पक्षातील काही लोकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश लांबला, पण तरीही शरद पवार यांनी शेरकर यांना गुरुवारी मुंबईतच थांबण्यास सांगितले होते. तर दुसरीकडे इच्छुकांना एकत्रित बसून निर्णया घेण्यास सांगितले होते. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले यापैकी एकाला उमेदवारी देण्याचा आग्रही धरण्यात आला होता. दरम्यान, आता विरोधा करणाऱ्यांच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तडजोडीअंती सत्यशील शेरकर यांच्या विरोधातील वातावरण आता मावळू लागले आहे.
Discussion about this post