कोपरगाव तालुका प्रतिनिधी -ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या तीन दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचे निधन झाल्याने उद्योग विश्वाची मोठी हानी झाली आहे.कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती.भारतीय उद्योगजगाला,भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं.त्यांच्या निधनानंतर सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्यातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रतनजी टाटा यांचे देशाच्या जडणघडणीत असलेले योगदान किती मोठे आहे तसेच टाटांनी आयुष्यात प्रत्येक माणूस जपला अशा भावना संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केल्या.
रतन टाटा हे आपल्या देशाला लाभलेले मौल्यवान रत्न होते.लाखो प्रपंच उभे करून अनेकांना वैद्यकीय,शैक्षणिक सुविधा मिळवून देण्यात टाटा ग्रुपचे मोठे योगदान आहे. संवेदनशील व्यक्तिमत्त्व असणारे रतन टाटा यांच्या निधनाने मोठी हानी देशाची झाली आहे.होतकरू उद्योजकांनी पथदर्शक सूर्य गमावला आहे.आपल्या कार्याने ते सर्वांसाठी आदर्श बनून आहेत त्यांचे विचार आणि राष्ट्रभक्ती डोळ्यासमोर ठेवत कार्यरत राहणे आवश्यक आहे.देशाला प्रत्येक संकटात तारून नेणाऱ्या राष्ट्रभक्ताच्या सहवासाची उणीव नेहमी जाणवत राहील असे कोल्हे म्हणाले.
या प्रसंगी व्हा.चेअरमन मनेश गाडे, जेष्ठ संचालक विश्वासराव महाले,कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार,जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, संचालक,चिफ केमिस्ट, सर्व खाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post